जबरदस्त लूकसह २०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० भारतात लॉन्च, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:55 IST2025-04-19T13:41:59+5:302025-04-19T13:55:41+5:30

2025 Kawasaki Eliminator 500 Launched In India: जबरदस्त लूक आणि दमदार फीचर्ससह २०२५ कावासाकी एलिमिनेटर ५०० भारतात दाखल झाली आहे.

प्रीमियम बाइक निर्माता कावासाकीने २०२५ एलिमिनेटर ५०० क्रूझर बाईक भारतात लॉन्च केली. ही बाईक मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. बाईकच्या एक्झॉस्ट पाईपला बर्निश केलेला तांब्याचा रंग मिळतो आणि एक्झॉस्ट हीट शील्डला ब्रश केलेला मेटॅलिक सिल्व्हर फिनिश मिळतो. (Photo Credit: X/ @KawasakiUSA)

२०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० मध्ये गोल हेडलॅम्प, रिअरव्ह्यू मिरर मिळतो, ज्यामुळे बाईक आणखी खास दिसते. बाईकमध्ये सरळ रायडिंग पोझिशन असून सीटची उंची ७३५ मिमी आहे. याशिवाय, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह गोल ऑल-डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट पॅनेलचा समावेश करण्यात आला आहे. (Photo Credit: X/ @KawasakiUSA)

या बाईकमध्ये ४५१ सीसी, लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन, ६-स्पीड गिअरबॉक्ससह असिस्ट आणि स्लिपर क्लच देण्यात आले आहे. २०२५ कावासकी एलिमिनेटर ५०० च्या पुढील बाजूस १८ इंच आणि मागील बाजूस १६ इंच चाके मिळत आहेत. (Photo Credit: X/ @KawasakiUSA)

ही बाईक ड्युअल-चॅनेल एबीएस आणि डिस्क ब्रेक सह येते. बाईकची किंमत ५ लाख ७६ हजार रुपये (एक्स शोरूम) आहे, जी आधीच्या बाईकच्या तुलनेत १४ हजारांनी वाढली आहे. (Photo Credit: X/ @KawasakiUSA)

भारतात या बाईकची थेट कुणाशी स्पर्धा नाही. परंतु, किंमतीबाबत विचार केल्यास रॉयल एनफील्ड सुपर मेटीओर ६५० त्यांना टक्कर मिळू शकतो. (Photo Credit: X/ @KawasakiUSA)