3 New Jawa Motorcycles Launched Check Specification Price and Availability
बुलेटप्रेमींनो...! एक नाही तर तीन भन्नाट मोटरसायकल आल्या... By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:56 PM2018-11-15T15:56:21+5:302018-11-15T18:15:06+5:30Join usJoin usNext भारतीय मनांवर अधिराज्य गाजवलेल्या भन्नाट मोटारसायकल जावाने पुन्हा भारतात पाऊल ठेवले आहे. रॉयल एनफिल्डच्या बुलेटला टक्कर देण्यासाठी जावाने एक नाही तर तीन खतरनाक लूक असलेल्या मोटारसायकल त्याही कमी किंमतीत आज लाँच केल्या आहेत. जावाने आज तीन मोटरसायकल लाँच केल्या. यातील सर्वात कमी जावा मोटारसायकलची किंमत 1.64 लाख, जावा 42 ची किंमत 1.55 लाख आणि फॅक्टरीमध्येच क्सटमाईज करता येणारी बॉबर मोटारसायकलला रावा पेरक असे नाव देत या मॉडेलची किंमत 1.89 लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे. पेरक ही मोटारसायकल तर हार्ले डेव्हिडसनचा लूक देते. ही बाईक काही दिवसांनी उपलब्ध होणार आहे. जावाने आज तीन मोटरसायकल लाँच केल्या. यातील सर्वात कमी जावा मोटारसायकलची किंमत 1.64 लाख, जावा 42 ची किंमत 1.55 लाख आणि फॅक्टरीमध्येच क्सटमाईज करता येणारी बॉबर मोटारसायकलला रावा पेरक असे नाव देत या मॉडेलची किंमत 1.89 लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे. पेरक ही मोटारसायकल तर हार्ले डेव्हिडसनचा लूक देते. ही बाईक काही दिवसांनी उपलब्ध होणार आहे. जावा या पहिल्या मोटारसायकलचा लूक कंपनीने जुन्या 1970-80 च्या दशकातील मोटारसायकल सारखाच ठेवला आहे. याला 300 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक रॉयल एन्फिल्डच्या 350 सीसीला थेट टक्कर देणार आहे. जवा काळा, ग्रे आणि मरून या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर जावा 42 ही बाईक सहा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये हॅले टील, गॅलॅटीक ग्रीन, स्टारलाईट ब्लू ल्युमस लाईम, नेब्युला ब्लू आणि कॉमेट रेड हे रंग आहेत. जावाच्या या पहिल्या दोन मोटारसायकलना 293 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. 6 स्पीड गिअरबॉक्स आहे. जावाला सिंगल चॅनल एबीएस असून वजन 170 किलो आहे. इंधन टाकी 14 लीटरची आहे. जावा पेरकला जावा आणि 42 चेच इंजिन देण्यात आले असले तरीही मोठे बोअर आणि 332 सीसीची क्षमता असल्याने थोडी जादा ताकद निर्माण होते. जावा कंपनीने 105 शहरांमध्ये डीलरशिप सुरु केली असून बाईकची डिलिव्हरी पुढील वर्षीच्या जानेवारीपासून देण्यात येणार आहे. जावाच्या या भन्नाट मोटारसायकल महिंद्राच्या मध्यप्रदेशमधील प्रितमपूर येथील प्रकल्पामध्ये बनणार आहेत. टॅग्स :जावामोटारसायकलरॉयल एनफिल्डjavamotercycleRoyal Enfield