Tata Nexon चे ४ नवे व्हेरिअंट लाँच; मिळणार हे जबरदस्त फीचर्स, पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 09:43 AM2022-03-01T09:43:19+5:302022-03-01T09:51:30+5:30

Tata Nexon : नेक्सॉन ही भारतातील आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

टाटा मोटर्सनं (TATA Motors) आपल्या रांजणगाव येथील प्रकल्पात भारतातील पहिल्या GNCAP 5 स्टार रेडेट कारचा आनंद साजरा केला. तसंच यावेळी कंपनीनं 3 लाख नेक्सॉन (TATA Nexon) रोलआऊट केल्या.

जून 2021 मध्ये कंपनीतून 2 लाख कार रोलआऊट झाल्यानंतर टाटा मोटर्सनं केवळ ८ महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत नक्सॉनच्या 1 लाख युनिट्सचं रेकॉर्ड प्रोडक्शन केलं आहे.

नेक्सॉन ही भारतातील आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. भारतातील टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रीक वाहन व्यवसायात नेक्सॉनने त्याच्या विभागातील सर्वाधिक योगदान दिले आहे.

Tata Nexon EV चे आजपर्यंत 13500 पेक्षा अधिक ग्राहक आहेत. तसंच याचा बाजार हिस्सा 62 टक्क्यांहून (YTD) अधिक आहे.

हे यश साजरे करताना, कंपनीने यशस्वी कॉम्पॅक्ट SUV च्या टॉप ट्रिम्सचे 4 नवीन व्हेरिअंट XZ+ (P) / XZA+ (P) आणि XZ+ (HS) / XZA+ (HS) पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह रॉयल ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केले. हे व्हेरिअंट Dark एडिशनमध्येही सादर केले जाणार आहेत.

नुकत्याच लाँच झालेल्या काझीरंगा एडिशनसह, नेक्सॉन आता 40 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. याच्या मदतीनं ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील.

या रेंजमध्ये 22 पेट्रोल व्हेरिअंट आणि 18 डिझेल व्हेरिअंट ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल पर्यायांसह उपलब्ध असतील. नवीन Tata Nexon किंमत 10.86 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.