Car Offers: 'या' तारखेपर्यंत टाटाच्या गाड्यांवर 75 हजार रुपयांचा डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:57 PM2023-01-10T14:57:17+5:302023-01-10T15:05:26+5:30

Offers On Tata Cars : टाटा मोटर्सकडून आपल्या अनेक कारवर डिस्काउंट देण्यात येत आहे. ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत वैध आहेत.

नवी दिल्ली : जानेवारी महिन्यात सहसा सर्व कार उत्पादक कंपन्या आपल्या कारच्या किमती अपडेट करतात. अपडेट करताना सहसा किमती वाढल्या जातात, कमी होत नाहीत. पण, यासोबतच कंपन्या आपल्या कारवर वर्षाच्या सुरुवातीला डिस्काउंटही देतात. टाटा मोटर्सही तेच करत आहे. टाटा मोटर्सकडून आपल्या अनेक कारवर डिस्काउंट देण्यात येत आहे. ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत वैध आहेत.

टाटा टियागोच्या 2022 मॉडेलवर 45,000 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत तर 2023 मॉडेलवर 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. टाटा टियागोची किंमत 5.45 लाख ते 7.90 लाख रुपये आहे.

टाटा अल्ट्रॉझच्या 2022 च्या मॉडेलवर 38,000 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत तर 2023 च्या मॉडेलवर 23,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटचा देखील समावेळ आहे. टाटा अल्ट्रॉझची किंमत 6.35 लाख ते 10.25 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

हॅरियर 2022 मॉडेलवर 75,000 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत तर 2023 मॉडेलवर 45,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. तसेच, सफारीच्या 2022 मॉडेलवर 75,000 हजार रुपयांपर्यंत आणि 2023 मॉडेलवर 45,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत.

याशिवाय, फक्त नेक्सॉनवर 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे. सफारीची किंमत 15.45 लाख ते 23.76 लाख रुपये आहे तर हॅरियरची किंमत 14.80 लाख ते 22.35 लाख रुपये आहे. नेक्सॉनची किंमत 7.70 लाख ते 14.18 लाख रुपयांपर्यंत आहे.