affordable electric cars in india form tata tigor ev to MG Comet ev
भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर मिळेल इतकी रेंज By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 03:28 PM2023-05-24T15:28:51+5:302023-05-24T16:13:39+5:30Join usJoin usNext electric cars : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. दरम्यान, भारतातील ईव्ही उद्योग अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या किमतीही जास्त आहेत. मात्र, काही स्वस्त इलेक्ट्रिक कारही बाजारात आहेत. त्याबद्दल जाणून घ्या...MG Comet EV : एमजी कॉमेट ईव्हीची किंमत 7.98 लाख ते 9.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही 2-दरवाज्याची कार आहे. यात 17.3kWh बॅटरी पॅक आहे, जो 230 किमीची रेंज देऊ शकतो. फूल चार्ज होण्यासाठी जवळपास सात तास लागतात.Tata Tiago EV : टाटा टिआगो ईव्हीची किंमत 8.69 लाख ते 11.99 लाख रुपये आहे. ही कार 310 किमी पर्यंतची रेंज देते. यामध्ये दोन बॅटरी पॅक ऑप्शन येतात. एक 19.2 kWh आणि दुसरा 24 kWh चा आहे. Citroen EC3 : सिट्रोएन ईसी 3 कारची किंमत 11.50 लाख ते 12.76 लाख रुपये आहे. ही कार 320 किमी पर्यंतची रेंज देते. यामध्ये 29.2 kWh चा बॅटरी पॅक मिळतो. कारची मोटर 57PS/143Nm जनरेट करते.Tata Tigor EV : टाटा टिगोर ईव्ही कारची किंमत 12.49 लाख ते 13.75 लाख रुपये आहे. ही कार 315 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. यात नेक्सॉन इलेक्ट्रिकसह जिप्ट्रॉन ईव्ही टेक्नॉलॉजी मिळते. यामध्ये 26 KWH चे बॅटरी पॅक येते.Tata Nexon EV : टाटा नेस्कॉन ईव्ही कार दोन व्हर्जनमध्ये येते. यात Nexon EV Prime आणि Nexon EV Max आहे. या कारची किंमत 14.49 लाख ते 19.54 लाख रुपये आहे. Nexon EV Max फूल चार्ज केल्यावर 453km रेंज देऊ शकते.टॅग्स :वाहनइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileelectric vehicle