After the success of the MPV Triber, Renault will bring a sub-compact SUV car to Kiger
MPV Triberच्या यशानंतर Renault आणणार Sub-Compact SUV कार Kiger By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 08:58 PM2020-01-02T20:58:21+5:302020-01-02T21:05:08+5:30Join usJoin usNext फ्रेंच वाहन निर्माती कंपनी असलेल्या Renault Indiaच्या MPV कार Triberनं भारतीय बाजारात दबदबा निर्माण केला आहे. या कारला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. या कारची लोकप्रियता पाहता गेल्या वर्षाच्या दोन महिन्यात जवळपास 10,000च्या घरात Renault Triberची विक्री झालेली आहे. Sub-Compact MPV (सब-कॉम्पॅक्ट एमपीवी) कार Triber (ट्रायबर)च्या यशानंतर Renault एक Sub-Compact SUV (सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही) कार लॉन्च करण्याचा तयारीत आहे. Renaultची ही नवी SUV कार याच वर्षी 2020च्या शेवटाला बाजारात येणार आहे. Renault Indiaचे सीईओ व्यंकटरमन मामिलापल्ले यांनी अशी माहिती दिली आहे. एका रिपोर्टनुसार, त्या नव्या SUV कारचं नाव Renault Kiger असेल. या कारला कोडनेम HBC दिलं आहे. Renault Indiaने नव्या कारसाठी Kiger (कायगर) नावाची नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे Kiger (कायगर) हे एक घोड्याच्या प्रजातीचं नाव आहे, जी अमेरिकेत पाहायला मिळते. Renault आपल्या नव्या SUV कारला फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोच्या माध्यमातून जगासमोर ठेवणार आहे. Renaultची ही नवी SUV कार CMF-A Moudular Platformवर आधारित राहणार आहे. कंपनीने याच प्लॅटफॉर्मवर सध्याच्या मॉडल्स Kwid आणि Triberचा वापर केला आहे. रेनॉ कायगरचा सामना मारुती ब्रिजा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, महिंद्रा एक्सयूव्ही 300सह अन्य एसयूव्ही होणार आहे. Kiger SUVमध्ये Triberमध्ये असलेलं 1 लीटर पेट्रोल इंजिनच वापरण्यात येणार आहे. हे इंजिन 71bhpची पॉवर आणि 96Nm टॉर्क निर्माण करणार आहे. Kigerमध्ये या इंजिनची टर्बोचार्ज्ड आवृत्ती देण्यात येणार आहे. जी Triberच्या इंजिनपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करू शकेल. या नव्या SUV कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. Kigerची डिझाइन कंपनी सध्याच्या मॉडल्स Triber आणि Dusterपासून घेऊ शकतात. नव्या SUV कारमध्ये Renault लोगोसह ट्रिपल-लेयर्ड ग्रिल, एलईडी डीआरएलबरोबरच प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग, साइड स्ट्राँग क्रीज आणि फॉक्स स्किड प्लेट्स पाहायला मिळणार आहेत. या एसयूव्ही कारमध्ये अधिकतर फीचर्स आणि इंटीरियर्स Renault Triberसारखेच असतील. या एसयूव्हीची किंमत 6 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत असू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.