Anand Mahindra: आनंद महिंद्रांच्या ताफ्यात कोणत्या कंपनीच्या कार? जाणून व्हाल हैरान... By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:07 PM 2021-05-14T16:07:45+5:30 2021-05-14T16:13:41+5:30
Which company's car in Anand Mahindra's fleet? आनंद महिंद्रा ही एवढी मोठी हस्ती आहे की, ते हव्या तेवढ्या किंमतीची, हव्या त्या कंपनीची कार विकत घेऊ शकतात. देशाच्या अग्रगण्य उद्योगपतींच्या यादीत असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह असतात. चांगले काम करणारा दिसला, काही वेगळे करताना दिसला तर ते मुक्त दिलाने त्याची स्तुती करतात. (Anand Mahindras Car collection.)
एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर ते अशा लोकांना त्यांच्या कंपनीच्या कार, बाईक भेटही देतात. ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर मयुर शेळके या रेल्वे कर्मचाऱ्याचे. त्याने अंध महिलेच्या मुलाला रेल्वेखाली जाण्यापासून वाचविले म्हणून त्यांच्या कंपनीने म्हणजेच जावा ने मयूरला मोटरसायकल भेट दिली. (Anand Mahindra using only Mahindra Cars, Know the reason)
क्रिकेटपटू, रिक्षाचालक, लोकांची मदत करणारे जे महिंद्रांना भावले त्यांना त्यांना महिंद्रांनी कार गिफ्ट केल्या आहेत.
आनंद महिंद्रांनी याच मयूरची स्तुती करत त्याला लवकरच थार ही दणकट आणि तेवढीच रावडी स्टाईल जीप भेट देण्याचे आश्वासनही दिले. नेहमी प्रमाणे ते देतीलही. परंतू अशा या अब्जाधीशाच्या ताफ्यात कोणत्या कार आहेत याची तुम्हाला माहितीही नसेल. ही माहिती जाणूनही तुम्ही हैरान व्हाल, हे नक्की.
आनंद महिंद्रा यांचा जन्म १ मे १९५५ मध्ये मुंबईत झाला. त्यांच्या आजोबांनी पंजाबच्या लुधियानामध्ये स्टीलचा उद्योग सुरु केला होता. त्यांच्या पश्चात या उद्योगाची जबाबदारी ही आनंद महिंद्रांवर आली.
आनंद महिंद्रा यांच्या ताब्यात आल्यावर कंपनीने सुरुवातीला शेतीचे ट्रॅक्टर बनविण्यास सुरुवात केली. आज महिंद्रा जगभरात आपल्या दणकट एसयुव्ही कारसाठी ओळखली जाते.
एवढा मोठा अब्जाधीश असुनही आनंद महिंद्रांच्या ताफ्यात केवळ आणि केवळ महिंद्राच्याच गाड्या आहेत. असे का हे त्यांनी एकदा सांगितले होते.
आनंद महिंद्रा ही एवढी मोठी हस्ती आहे की, ते हव्या तेवढ्या किंमतीची, हव्या त्या कंपनीची कार विकत घेऊ शकतात. परंतू ते फक्त महिंद्राच्याच गाड्या वापरतात.
जर मी माझ्या कंपनीची गाडी वापरली नाही, तर ग्राहक माझ्या कंपनीच्या गाड्यांवर कसा विश्वास ठेवतील, असा साधा प्रश्न त्यांनी केला होता. या प्रश्नातच त्यांचे उत्तर होते.
आनंद महिंद्रांच्या ताफ्यात बलेरो, स्कॉर्पिओ, टीयुव्ही 300, टीयुव्ही 300 प्लस, अल्टुरास जी 4, Mahindra Thar या कार आहेत.
यापैकी टीयुव्ही 300 प्लसला त्यांनी खास बदलले आहे. त्यांनी खास ग्रे कलर दिला आहे. या कारला त्यांनी ग्रे घोस्ट असे नाव दिले आहे. Mahindra TUV 300 ला देखील त्यांनी मॉडिफाय केले आहे. अलॉय व्हील्स, बोनेट आणि लाईट त्यांनी मॉडिफाय केले आहेत.