Auto Expo 2023: Supercars, Superbikes, E-Vehicles Allure! Youth crowd at Auto Expo
Auto Expo 2023: सुपरकार्स, सुपरबाइक, ई-वाहनांचे आकर्षण! ऑटो एक्स्पोमध्ये तरुणाईची गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:14 AM2023-01-17T09:14:06+5:302023-01-17T09:19:10+5:30Join usJoin usNext सी१००२व्ही क्रुझर - सी१००२व्ही क्रुझरमध्ये ९९७ सीसी व्ही ट्विन इंजिन आहे. ९५बीएचपी पॉवर आणि १०२ एनएम टॉर्क निर्माण करते. गाडीला ६ स्पीड गिअर्ससह इंटरनेट कनेक्टिव्हीटी, रिमोट शट डाउन, पॅनिक बटण इत्यादी अत्याधुनिक फिचर्स बाइकला आहेत. या बाइकची किंमत सुमारे १२ लाखापर्यंत असू शकते. एमबीपीने आणल्या दोन सुपरबाइक: मोटो बोलोना पॅशन या इटालियन बाईकमेकर कंपनीने एम५०२एन आणि सी२००२व्ही या दोन सुपरबाइक सादर केल्या. एम५०२एन - ‘एम५०२एन’मध्ये ४८६ सीसी पॅरलल ट्विन इंजिन आहे. ते ४६.९ बीएचपी पॉवर आणि ४५एन टॉर्क निर्माण करते. बाइकला ६ स्पीड गिअर्स आहेत. याशिवाय ॲडजस्टेबल सस्पेन्शन, ड्युअल चॅनल एबीएस इत्यादी फीर्चस आहेत. टोयोटा लँड क्रुझर ३०० या गाडीची किंमत आहे तब्बल २.१७ कोटी रुपये. भारतात सादर केलेल्या गाडीला ३.३ लीट टर्बी व्ही६ डिझल इंजिन आहे. १० स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समशीनसह ते ३०० बीएचपी पाॅवर, ७०० एनएम टॉर्क निर्मिती करते. याशिवाय एसयूव्हीमध्ये आधुनिक फीर्चस देण्यात आली आहेत. या गाडीसाठी अनेक देशांमध्ये २ ते ३ वर्षांचे वेटिंग आहे. भारतात गाडीसाठी बुकिंग सुरू झाले असून त्यासाठी १० लाख रुपये मोजावे लागतील. पहिली सोलर हायब्रीड कार ‘इव्हा’ पुण्यातील वायवे मोबिलिटी या कार उत्पादक कंपनीने इव्हा ही भारतातील पहिली सोलर कार सादर केली. कार दिसायला छोटीशी आहे. पण त्यात दोन मोठे व्यक्ती आणि एक लहान मूल सहज बसू शकते. गाडीच्या छतावर सोलर पॅनेल्स देण्यात आले आहेत. ही कार सोलर आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही पद्धतीने चार्ज होउ शकते. गाडीला १४ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी, ६ किलोवॅटची मोटर असून ४५ मिनिटात ८० टक्के चार्ज होते. गोदावरी इलेक्ट्रिक ऑटो गोदावरील इलेक्ट्रिकने इबलू रोजी हा ऑटोरिक्षा आणि इबलु स्पिन ही सायकलींची श्रृंखला सादर केली. २०० एएच लिथियम बॅटरी, १६५ किमी रेंज एका चार्जमध्ये, ३० पैसे प्रति किमी खर्च लष्करासाठी ‘वीर’ इव्ही बंगळुरू येथील स्टार्टअप प्रवेग या कंपनीने खास लष्करासाठी ‘वीर’ इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे. ९०.९ केडब्ल्यूएच क्षमतेची बॅटरी असून सिंगल चार्जमध्ये ५०० किमीपेक्षा जास्त रेंज आहे. तसेच लष्करासाठी आवश्यक सुविधा व तंत्रज्ञानाने ‘वीर’ सुसज्ज आहे. होंडा एक्सआरई३०० होंडा कंपनीने यावेळी ऑटो एक्स्पेमध्ये सहभाग घेतलेला नाही. मात्र, कंपनीची फ्लेक्स इंधनावर चालणारी आंतरराष्ट्रीय बाइक एक्सआरई३०० येथे सादर करण्यात आली.. हा बाइक इथेनॉल आणि पेट्रोल दोन्हीवर धावते. बाइकला २९१ सीसी इंजिन असून ते पेट्रोलवर २५.४ बीएचपी पॉवर आणि २७.६ एनएम टॉर्क निर्माण करते. इथेनॉलवर ते किंचित जास्त पॉवर निर्माण करते. Auto Expo 2023: सर्वांसाठी खुला झाल्यानंतर वाहनप्रेमींनी तेथे गर्दी केली. गेल्या दोन दिवसांमध्ये सादर करण्यात आलेली विविध वाहने वाहनप्रेमींना खुणावत आहे. यंदा एक्स्पोत सर्वांना आकर्षण आहे ई-वाहनांचे तसेच काही सुपर बाइक्स आणि महागड्या लक्झरी कार आणि एएसयूव्हींचे. टॅग्स :बाईककारbikecar