Auto Expo introduced in 2020 5 electric cars, Learn Features
Auto Expo 2020मध्ये सादर केल्या 5 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 03:57 PM2020-02-10T15:57:08+5:302020-02-10T16:08:53+5:30Join usJoin usNext Explore the World of Mobility (एक्सप्लोर द वर्ल्ड ऑफ मोबिलिटी)च्या थीमबरोबर Auto Expo 2020 (ऑटो एक्सपो-2020) मोटर शोमध्ये अनेक गाड्या सादर करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक गाड्या या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. दोन वर्षातून एकदा होणाऱ्या Auto Expoमध्ये शानदार Electric Vehiclesचं अनावरण करण्यात आलं आहे. Tata Altroz EV टाटा मोटर्सनं भारतीय बाजारात आपली ऑल-न्यू Tata Altroz EV (टाटा अल्ट्रॉज ईव्ही)चं अनावरण केलं आहे. Tata Altroz EV कंपनीची प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉजवर आधारित आहे. कंपनीनं आधीच स्पष्ट केलं आहे की, या हॅचबॅक ईव्हीची विक्री याच वर्षी सुरू होणार आहे. टाटा मोटर्स Altroz EVनं नव्या अल्फा प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. या प्लेफॉर्मवर आधारित ही पहिलीच इलेक्ट्रिक कार आहे. Altroz EV एकदा फुल चार्ज केल्यानंतर 250 ते 300 किलोमीटरचं अंतर कापणार आहे. Mahindra e-XUV300 महिंद्राची लोकप्रिय Sub-Compact SUV (सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही) XUV300मध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेनचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं इलेक्ट्रिक कार eKUV100शिवाय इलेक्ट्रिक कार eXUV300लाही बाजारात उतरवलं आहे. e-XUV300 एसयूव्हीमध्ये 350V आणि 380V पॉवरट्रेनचा पर्याय मिळणार आहे. Ora R1 चीनची कार निर्माता कंपनी Great Wall Motors (ग्रेट वॉल मोटर्स)ने Auto Expo 2020मध्ये पहिल्यांदाच भारतात आपल्या गाड्या सादर केल्या आहेत. ग्रेट वॉल मोटर्सनं आपल्या Haval SUVचं ऑटो एक्स्पोमध्ये सादरीकरण केलं आहे. कंपनीनं ऑटो एक्स्पोमध्ये Ora R1 इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट कारही सादर केली आहे. ऑटो एक्स्पोमध्ये Great Wall Motorsनं पॅव्हेलियनमध्ये Ora R1 सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. MG Marvel X ब्रिटिश कार निर्माता कंपनी Morris Garages (मॉरिस गॅरेज)नं या द्विवार्षिक मोटर शोमध्ये आपली इलेक्ट्रिक कार Marvel X सादर केली. या कारमध्ये ऑटोनोमस लेव्हल-3 इंलेटिजेंट सिस्टीमचा वापर केला आहे. कार निर्माता कंपनीच्या दाव्यानुसार Marvel X सिंगल चार्जिंगवर 500 किलोमीटरचं अंतर कापणार आहे. Marvel X कारचा टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रतितास आहे. Renault K-ZE फ्रान्सची दिग्गज कार निर्माता Renaultने Auto Expo 2020मध्ये भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक कार Renault K-ZE सादर केली होती. रेनोटी ही एन्ट्री लेवल इलेक्ट्रिक कार आहे. Renault K-ZEमध्ये 26.8 kwhची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे. एसी चार्जरवर ही गाडी 4 तासांत पूर्ण चार्ज होणार आहे. तर डीसी फास्ट चार्जरवर ही गाडी फक्त 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होणार आहे.