विश्वास नाही बसणार...ऑटोमोबाईलच्या विश्वातील फेक वाटणाऱ्या पण खऱ्याखुऱ्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 09:17 AM2019-04-15T09:17:09+5:302019-04-15T09:28:28+5:30

फेक न्यूज या केवळ निवडणूक काळापुरत्याच मर्यादित नाहीत. तर ऑटोमोबाईल सेक्टरशी संबंधीतही आहेत. मात्र अशा काही अतिशोयक्ती वाटणाऱ्या गोष्टीही आहेत ज्या प्रत्यक्षात खऱ्याखुऱ्या आहेत पण विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत.

100 रुपयांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याविरोधात सुरु होणाऱ्या दंडाच्या देशात कोणी सांगेल की 8 कोटी रुपयांचे चलन फाडले तर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. आपल्या भारतात नाही तर स्वीडनमध्ये. या देशात दंडाची रक्कम सरकार किंवा पोलिस नाही तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर ठरते. जेवढे जास्त उत्पन्न तेवढा जास्त दंड हे त्याचे सूत्र. एका व्यक्तीने तेथील रस्त्यांवर 180 मैल प्रति तासाच्या वेगाने (290 किमी) कार चालविली, त्याला 1.15 दशलक्ष डॉलरचे चलन भरावे लागले होते.

युरोपमधील रॉयल्स मरीन्सच्या 5 कर्मचाऱ्यांच्या टीमने एक-दोन तासांत नाही तर तब्बल 42 सेंकदांमध्ये कारचे जुने इंजिन काढून त्याजागी दुसरे नवे इंजिन बसविण्याचा पराक्रम केला. त्यांनी नुसते इंजिन बदलले नाही तर ही कारही त्यांनी काही काळ चालविली.

रोल्स रॉयस या जगप्रसिद्ध कंपनीची पहिली कार 1900 च्या सुरवातीला बनविण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे या कंपनीच्या कार कितीही पैसा असला तरीही कोणीही खरेदी करू शकत नाही. या कार केवळ प्रसिद्ध व्यक्ती, यशस्वी उद्योगपतीच विकत घेऊ शकतात. शिवाय या कार दुसऱ्या व्यक्तीला विकताही येत नाहीत. तसा करारच केलेला असतो. आश्चर्याची बाब म्हणजे या कंपनीच्या जवळपास 75 टक्के कार या आजही रस्त्यांवर धावत आहेत.

काहीतरीच काय? 3 लाख असेल. नाही, खरेच एक कार अशीही आहे जी 30 लाख किमी चालविण्यात आली आहे. इर्विन गॉर्नड यांनी 1966 मध्ये व्होल्वो या कंपनीचा पी 1800 ही कार खरेदी केली होती. यासाठी त्यांनी तेव्हा 4 हजार डॉलर दिले होते.

त्यांनी ही कार तब्बल 30 लाख किमी चालविली आहे. या काळात त्यांनी 857 वेळा ऑईल, 30 वेळा ड्राईव्ह बेल्ट आणि 120 बॉटल ट्रान्समिशन फ्ल्यूड बदलले आहे.

आपल्याकडे मद्यपी चालकांवर कारवाई केली जाते. मात्र, या चालकाने दारु पिलेली आहे की नाही याचे ब्रेथलायझर कीट पोलिसांकडे असते. बऱ्याचदा पोलिस त्यांच्या नाकावर फुंकर मारायला सांगतात. ही अवस्था असताना फ्रान्समध्ये वेगळेच नियम आहेत. चालकाला प्रवासावर निघताना त्याच्या सोबत फ्लोरोसेंट वेस्ट, रिप्लेसमेंट हेडलैम्प बल्बसह फर्स्ट एड किट सारख्या वस्तू ठेवाव्या लागतात. याचबरोबर ब्रेथलायझर कीटही सोबत ठेवावे लागते.

बीएमडब्ल्यू एम 5 या प्रसिद्ध कारमध्ये लावण्यात आलेले इंजिन एवढे शांत आहे की आतमध्ये बसलेल्या व्यक्तीला ते सुरु असल्याचेही कळत नाही. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. यासाठी कंपनीने इंजिनच्या चालू-बंद अवस्थेला डिजिटल सिग्नल प्रोसेसरशी जोडून स्पिकरद्वारे इंजिन सुरु असल्याचा आवाज दिला आहे.