Benelli's Two Adventure Bike Launches In India; The price is strong ...
Benelli च्या दोन अॅडव्हेंचर बाईक भारतात लाँच; किंमतही दमदार... By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:48 PM2019-02-18T16:48:43+5:302019-02-18T16:54:26+5:30Join usJoin usNext Benelli या आंतरराष्ट्रीय कंपनीने पहिल्यांदाच अॅडव्हेंचर टूरर बाईक भारतात लाँच केल्या आहेत. TRK 502 आणि 502X असे या बाईकचे नाव आहे. कंपनी आपल्या बाईक CKD च्या माध्यमातून भारतात विकणार आहे. Benelli TRK 502 या बाईकची किंमत भारतात 5 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. तर ऑफरोड 502X व्हेरिअंटची किंमत 5.4 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. Benelli ने भारतीय दुचाकी बाजारात विस्तारण्यासाठी हैदराबादच्या महावीर ग्रूपसोबत सहकार्य करार केला आहे. Benelli ने गेल्या वर्षीच TNT 300, 302R आणि TNT 600i लाँच केली होती. Benelli च्या या नव्या बाईकची स्पर्धा Kawasaki Versys 650, Suzuki V-Strom 650XT आणि SWM SuperDual T शी स्पर्धा करणार आहेत. Benelli TRK 502 आणि 502X मध्ये 499.6 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये फ्युअल इंजेक्टेड, पॅरलल ट्वीन मोटर देण्यात आली आहे. Benelli चे इंजिन 8500 आरपीएमवर 47.6 पीएसची ताकद निर्माण करते. 4500 आरपीएमवर 45 Nmचा पीक टॉर्क निर्माण करते. Benelli चे हे इंजिन 6-स्पीड ट्रांसमिशनचे आहे. TRK 502मध्ये 17 इंचाचे अॅल्युमिनिअम अलॉय व्हिल्स आणि 502X मध्ये पुढे 19 आणि मागे 17 इंचाचे स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. दोन्ही बाईक्सचे वजन 235 किलो आहे. या बाईक 25.6 किमीचे मायलेज देतील असा कंपनीने दावा केला आहे. 29 लीटरची टाकी देण्यात आली आहे.टॅग्स :बाईकवाहनbikeAutomobile