Best Electric Scooters: पैसे वाचवा! 'या' आहेत 50000 रुपयांच्या बजेटमधील बेस्ट इलेक्ट्रीक स्कूटर; 121 किमीची रेंज By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:17 PM 2021-11-15T13:17:47+5:30 2021-11-15T13:39:00+5:30
Best Electric Scooters Bike Under 50000 Rupees: भडकलेल्या इंधन दरांवर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा दिवाळीच्या निमित्ताने मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली. परंतू लोकांच्या डोक्याला लागलेली आग आता शमण्याचे नाव घेत नाहीय. पेट्रोल, डिझेलवरील कारच नाही तर आता स्कूटर देखील परवडत नाहीय. भडकलेल्या इंधन दरांवर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा दिवाळीच्या निमित्ताने मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केली. परंतू लोकांच्या डोक्याला लागलेली आग आता शमण्याचे नाव घेत नाहीय. पेट्रोल, डिझेलवरील कारच नाही तर आता स्कूटर देखील परवडत नाहीय.
यामुळे लोक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळू लागले आहेत. परंतू इलेक्ट्रीक स्कूटरदेखील महाग आहेत. लाखाच्या वर चांगल्या कंपन्यांच्या स्कूटर आहेत. परंतू पन्नास हजारातही तुम्हाला दररोजच्या वापरासाठी इलेक्ट्रीक स्कूटर मिळतात. कोणत्या त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोमाकी (Komaki), एम्पियर (Ampere), हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric), रफ्तार (Raftaar), ओकिनावा (Okinawa) सारख्या कंपन्यांच्या स्कूटर 50000 रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या स्कूटर चांगली बॅटरी रेंजही देतात तसेच या स्कूटरची विक्रीदेखील चांगली होत आहे.
जर तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooters Under 50K) खरेदी करायची असेल तर अशा 10 स्कूटर आहेत. या इलेक्ट्रीक स्कूटरची माहिती, बॅटरी रेंजबाबत तुम्हाला कल्पना देणार आहोत. (Top 10 Electric Scooters In India) तुमचे खरोखरच पैसे वाचणार आहेत.
भारतात 50000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Hero Electric Flash चा पर्याय आहे. याची किंमत 46,640 रुपये ते 56,940 रुपये आहे. बॅचरीची रेंज 85 किमीचा दावा. Hero Electric Dash ही स्कूटरदेखील चांगला ऑप्शन आहे. या स्कूटरची किंमत 50000 रुपयांपासून सुरु होते. कंपनीच्या दाव्यानुसार या स्कूटरची रेंज 60 किमी आहे.
कोमाकी कंपनीची Komaki XGT KM इलेक्ट्रीक स्कूटर 42,500 रुपयांपासून सुरु होते. या स्कूटरच्या बॅटरीची रेंज 85 किमी आहे. Komaki Xone ही देखील 45,000 रुपयांच उपलब्ध आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 85 किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Komaki ची आणखी एक तिसरी स्कूटर देखील चांगला पर्याय आहे. Komaki X2 Vouge या स्कूटरची किंमत 47,000 रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 85 km किमी जाते असा दावा आहे.
तुमच्या माहितीसाठी कंपन्या आयडियल कंडिशनमध्ये ही रेंज काढतात. वाहतूक कोंडी, चढ-उतार, जोरात चालविणे आदी प्रकार ते करत नाहीत. यामुळे तुम्हाला या स्कूटरची रेंज तुमच्या कडील रस्ते, भौगोलिक परिस्थिती, तुमची स्कूटर चालविण्याची सवय आदीवर अवलंबून असते. परंतू, साधारण 85 किमी रेंजची स्कूटर 50-55 किमीची रेंज देईल. जी दैनंदिन वापरासाठी योग्य आहे.
भारतात 50 हजारांच्या रेंजमध्ये आणखी काही स्कूटर आहेत. या रेंजमध्ये सर्वाधिक बॅटरी रेंज देणारी स्कूटर Ampere Magnus आहे. या स्कूटरची किंमत 49,999 रुपयांपासून सुरु होते. ही स्कूटर तुम्ही सिंगल चार्जमध्ये 121 किमी एवढी लांब अंतरासाठी चालवू शकता.
Ampere Reo देखील चांगला पर्याय आहे. याची बॅटरी रेंज 60 किमी आहे किंमत 43,490 रुपये. तिसरी स्कूटर Ampere V48 आहे, या स्कूटरची रेंज 45 km किमी पर्यंत आहे. (सर्व फोटो प्रातिनिधीक))