Best Mileage Scooters: जबरदस्त मायलेज देतात या ५ स्वस्त स्कूटर्स, पेट्रोलच्या किंमतीचीही चिंता होणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:06 AM 2022-12-28T11:06:20+5:30 2022-12-28T11:31:53+5:30
जर तुम्ही जास्त मायलेज देणारी स्कूटर शोधत असाल तर तुमचा शोध इथेच संपू शकतो कारण आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वाधिक मायलेज असलेल्या ५ स्कूटर्सची माहिती घेऊन आलो आहोत. जर तुम्ही जास्त मायलेज देणारी स्कूटर शोधत असाल तर तुमचा शोध इथेच संपू शकतो कारण आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वाधिक मायलेज असलेल्या ५ स्कूटर्सची माहिती घेऊन आलो आहोत.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही जास्त मायलेज असलेली स्कूटर शोधत असाल तर तुमचा शोध इथेच संपू शकतो. कारण आम्ही तुमच्यासाठी देशातील सर्वाधिक मायलेज असलेल्या 5 स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत. पाहुया कोणत्या आहेत त्या स्कूटर्स आणि किती आहे त्याची किंमत.
YAMAHA FASCINO HYBRID 125 - या स्कूटरमध्ये 125cc एअर-कूल्ड इंजिनसह एक माईल्ड-हायब्रिड सेटअप मिळत, ज्याच्या मदतीनं 68 kmpl चा मायलेज मिळण्यास मदत करते. हे इंजिन 8.2PS/10.3Nm पॉवर आउटपुट जनरेट करते. यास्कूटरची किंमत 76,600-87,830 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
YAMAHA RAYZR 125 - ही एक अधिक स्पोर्टियर स्कूटर आहे, या स्कूटरमध्ये 125cc इंजिनसह माईल्ड-हायब्रिड सेटअप देखील मिळते, जे सुमारे 68 kmpl चे मायलेज देण्यास मदत करते. यामाहाच्या या स्कूटरची किंमत 80,730-90,130 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही स्कूटर पाच व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे.
SUZUKI ACCESS 125 - यात 124cc, फ्युएल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे, जे सुमारे 64 kmpl चा मायलेज देते. स्कूटरची किंमत 77,600-87,200 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. या स्कूटरची फ्युअल टॅक कॅपॅसिटी 5 लिटरची आहे.
TVS JUPITER - या स्कूटरमध्ये इंटेलिगो आयडल स्टार्ट/स्टॉप फंक्शनसह 110cc इंजिन देण्यात आले आहे. हे अंदाजे 62 kmpl चे मायलेज देते. या स्कूटरची किंमत सुमारे 70-85 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.
HONDA ACTIVA 6G - होंडाच्या या स्कूटरची किंमत 73,086 ते 76,587 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. यामध्ये 109.51cc, सिंगल-सिलिंडर, फ्युअल-इंजेक्टेड इंजिन मिळते, जे सुमारे 60 kmpl चा मायलेज देते.