70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:59 PM2024-10-15T18:59:01+5:302024-10-15T19:28:37+5:30

Best Bike, Scooter Under 70000 Rupees: Hero MotoCorp, Honda, TVS आणि Bajaj सारख्या कंपन्यांच्या 70 हजारांच्या किंमतीच्या श्रेणीतील गाड्या जाणून घ्या. त्या ग्राहकांना आवडतील आणि मायलेजच्या बाबतीतही जबरदस्त आहेत.

सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त तुम्ही तुमच्या घरी नवीन बाईक किंवा स्कूटर आणण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक ग्राहक स्वस्तात मस्त गाड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी Hero MotoCorp, Honda, TVS आणि Bajaj सारख्या कंपन्यांच्या 70 हजारांच्या किंमतीच्या श्रेणीतील गाड्या जाणून घ्या. त्या ग्राहकांना आवडतील आणि मायलेजच्या बाबतीतही जबरदस्त आहेत.

हिरो मोटोकॉर्पची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी मोटारसायकल, एचएफ डिलक्सची (Hero HF Deluxe) एक्स-शोरूम किंमत 59,998 रुपयांपासून सुरू होते आणि 69,018 रुपयांपर्यंत जाते.

होंडाच्या लोकप्रिय कम्युटर बाईक शाईन 100 ची (Honda Shine 100) एक्स-शोरूम किंमत 64,900 रुपये आहे. होंडा शाईनची भारतातही चांगली विक्री होते.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या शानदार मोपेड एक्सएल 100 ची (TVS XL100) एक्स-शोरूम किंमत 44,999 रुपयांपासून सुरू होते आणि 60,905 रुपयांपर्यंत जाते.

बजाज प्लॅटिना लिमिटेडची लोकप्रिय कम्युटर बाईक प्लॅटिना 100 ची (Bajaj Platina 100) एक्स-शोरूम किंमत 68,685 रुपये आहे.

हिरो मोटोकॉर्पच्या एंट्री लेव्हल बाईक एचएफ 100 ची (Hero HF 100) एक्स-शोरूम किंमत 59,018 रुपये आहे. देशातील सर्वोत्कृष्ट मायलेज देणारी ही बाईक आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या कम्युटर मोटरसायकल रेडियनची (TVS Radeon) एक्स-शोरूम किंमत 59,880 रुपये आहे. टीव्हीएस रेडियन हिरो स्प्लेंडरला टक्कर देऊ शकते.

होंडा डिओ (Honda Dio) स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 70,211 रुपये आहे. होंडा डिओची भारतीय बाजारपेठेत चांगली विक्री होते.

टीव्हीएसची स्वस्त स्कूटर स्कूटी पेप प्लसची (TVS Scooty Pep Plus) एक्स-शोरूम किंमत 65,514 रुपयांपासून सुरू होते आणि 68,414 रुपयांपर्यंत जाते.

ओला (Ola) इलेक्ट्रिक स्कूटरच्या एस1 एक्स (Ola S1X) मॉडेलची ऑक्टोबरमध्ये एक्स-शोरूम किंमत सध्या 49,999 रुपये आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीची आणखी एक लोकप्रिय कम्युटर बाईक टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport) आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 59,881 रुपयांपासून सुरू होते आणि 71,383 रुपयांपर्यंत जाते.