'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:07 PM2022-04-15T12:07:37+5:302022-04-15T12:14:03+5:30

Electric Scooter : टू व्हीलर सेगमेंटमध्ये अशा काही स्कूटर आहेत, ज्या चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही.

भारतीय ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे, विशेषत: टू व्हीलर सेगमेंटमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. दरम्यान, टू व्हीलर सेगमेंटमध्ये अशा काही स्कूटर आहेत, ज्या चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही. त्या पुढील प्रमाणे...

हिरो एडी (Hero Eddy) ही एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 72,000 रुपये आहे. ही स्कूटर2 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात रिव्हर्स मोड, यूएसबी पोर्ट आणि फाइंड माय बाईक सारखे फीचर्स आहेत.

Yo Edge ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची दिल्लीत ऑन-रोड किंमत 49,000 रुपये आहे. ही स्कूटर 1 व्हेरिएंट आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे समोर आणि मागील दोन्ही डिस्क ब्रेकसह येते.

Evolet Pony ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत 45,999 ते 57,999 रुपये आहे. ही स्कूटर 2 व्हेरिएंट आणि 1 रंगात उपलब्ध आहे. ही फ्रंट आणि रिअर दोन्ही डिस्क ब्रेकसह येते.

Techo Electra Neo ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत 41,919 रुपये आहे. ही स्कूटर 1 व्हेरिएंट आणि 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही फ्रंट आणि रिअर दोन्ही डिस्क ब्रेकसह येते.

Ampere REO ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याची दिल्लीत ऑन-रोड किंमत 48,370 ते 62,652 रुपये आहे. ही स्कूटर 2 व्हेरिएंट आणि 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही फ्रंट आणि रिअर दोन्ही डिस्क ब्रेकसह येते.

Ampere Reo Elite या इलेक्ट्रिक स्कूटरची दिल्लीत ऑन-रोड किंमत 42,999 ते 59,990 रुपये आहे. ही 2 व्हेरिएंट आणि 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे.ही फ्रंट आणि रिअर दोन्ही डिस्क ब्रेकसह येते.