धूम धूम! जगातली सर्वात वेगाने धावणारी ब्लडहाउंड कार विकली जाणार, कारला लागणारा खर्च वाचून व्हाल अवाक्.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 13:18 IST2021-01-27T13:09:19+5:302021-01-27T13:18:45+5:30

ब्लडहाउड सुपरसोनिक कारचे मालक इयान वॉरहर्स्ट यांनी सांगितले की, या कारला आता १२८८ किलोमीटर प्रति तास इतका वेग मिळवायचा आहे.

जमिनीवर चालणारी जगातली सर्वात वेगवान कार आता विक्रीसाठी तयार आहे. या कारचं नाव आहे ब्लडहाउड सुपरसोनिक कार. या कारने जमिनीवर चालणाऱ्या सर्वच कार्सचा रेकॉर्ड तोडला आहे. २०१९ मध्ये या कारने १०१० किलोमीटर प्रति तास इतका वेळ मिळवला होता. आता या कारच्या मालकाला असं वाटतं की, ही कार दुसरं कुणी चालवावी आणि त्यांनी या कारचा सांभाळ करावा.

ब्लडहाउड सुपरसोनिक कारचे मालक इयान वॉरहर्स्ट यांनी सांगितले की, या कारला आता १२८८ किलोमीटर प्रति तास इतका वेग मिळवायचा आहे. या कारने २०१९ मध्ये कालाहारी वाळवंटात सर्वात वेगवान कार असण्याचा रेकॉर्ड केला होता. मात्र, आता इयान यांना ही कार विकायची आहे.

यॉर्कशायरमध्ये राहणारे इयान वॉरहर्स्ट म्हणाले की, ब्लडहाउड सुपरसोनिक कारला १२८८ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाच्या रेकॉर्डपर्यंत नेण्यासाठी यात एक रॉकेटचं इंजिन लावण्याची गरज आहे. याला एकूण ८०.११ कोटी खर्च येईल. त्यानंतर ही पृथ्वीवर चालणारी आणखी सर्वात वेगवान कार होईल.

इयान वॉरहर्स्टन बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ब्लडहाउड सुपरसोनिक कारच्या प्रोजेक्टमध्ये मी आता माझे पैसे लावू शकत नाही. मी खूप गोष्टी मिळवल्या आहेत. आता दुसऱ्या कुणाची तरी वेळ आहे. १२८८ किलोमीटर प्रति तासाचा रेकॉर्ड मी तोडू शकलो नाही. तो दुसरं कुणी तोडेल.

जगाच्या इतिहासात आतापर्यंत केवळ ७ कार्स अशा तयार झाल्या आहेत ज्या ९६५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, ब्लडहाउस सुपरसोनिकने हे रेकॉर्ड तोडले आहेत. ही कार १२८८ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. पण त्यासाठी कारमध्ये बरेच पैसे टाकावे लागतील.

ब्लडहाउड सुपरसोनिक कारमध्ये सध्या लढाऊ विमान यूरोफायटर टायफूनचं जेट इंजिन लावण्यात आलं आहे. पण आता याचा वेग वाढण्यासाठी यात एका रॉकेटचं इंजिन लावालं लागेल. आता इयान वॉरहर्स्ट यांना हा प्रोजेक्ट दुसऱ्या कुणालातरी विकायचा आहे.

इयान यांनी सांगितले की, जे कुणी ही कार खरेदी करतील ते ग्राफ्टन एलएसआर लिमिटेडला कंट्रोल करतील. ब्लडहाउस सुपरसोनिक कार याच कंपनीची आहे. मात्र, ही कार ते किती रूपयांना विकणार हे त्यांनी सांगितले नाही.