BMW नं लाँच केली जबरदस्त बाईक, ३९९९ रूपयांच्या EMI मध्ये घरी नेता येणार; पाहा भन्नाट ऑफर By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:59 PM 2022-07-16T12:59:15+5:30 2022-07-16T13:09:14+5:30
BMW ने आपली प्रीमियम आणि लक्झरी बाईक 2022 BMW G 310 RR भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. BMW ने आपली प्रीमियम आणि लक्झरी बाईक 2022 BMW G 310 RR भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. BMW Motorrad ने दोन व्हेरिअन्टमध्ये ही बाईक भारतात लॉन्च केली आहे.
लॉन्चसोबतच कंपनीने प्री-बुकिंगही सुरू केली आहे. म्हणजेच भलेही ही बाईक तुमच्या बजेचमध्ये नसेल, पण ती तुमच्या बजेटच्या बाहेर नाही. आजकाल भारतीय बाजारपेठेत एका चांगल्या स्पोर्ट्स बाइकची किंमत 2 लाखांहून अधिक आहे.
अशा परिस्थितीत ही BMW ची बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या बाइकसह उत्कृष्ट लूकसह जबरदस्त राइडिंगचा अनुभव मिळेल. ही बाइकच्या अनेक जबरदस्त फीचर्ससह येते. या बाईकमध्ये काय खास आहे ते पाहूया.
नव्या BMW G 310 RR मध्ये 313cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. ते 33.5bhp पॉवर आणि 28Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकचे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
तुम्हाला बाइकमध्ये चार राइडिंग मोड मिळतात. ट्रॅक आणि स्पोर्ट मोडमध्ये बाइकचा टॉप-स्पीड 160Km/h आहे. त्याच वेळी रेन आणि अर्बन मोडमध्ये या बाइकचा टॉप स्पीड 125Km/h इतका आहे. या बाइकचे कर्व्ह वेट 174 किलो आहे.
BMW G 310 RR च्या सीटची लांबी 811 मिमी आहे. बाईकचा इनर कर्व्ह 1830 मिमी आहे. बाईकमध्ये 11 लीटरचा युझेबल फ्युअल टँक देण्यात आलाय. शिवाय बाईकमध्ये अॅल्युमिनिमची व्हिल्स देण्यात आले आहेत.
बाईकचे पुढील टायर 110/70 R 17 आणि मागील टायर 150/60 R 17 चा आहे. त्याच्या मागील बाजूस प्री-लोड अॅडजस्टेबल सस्पेंशन देण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी, यात ABS सह सिंगल डिस्क फ्रंट ब्रेकही देण्यात आला आहे.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात अँटी-हॉपिंग क्लच, चेन ड्राइव्ह, रिव्होल्युशन काउंटर, एलईडी फ्लॅश टर्न इंडिकेटर, एलईडी टेल लाईट, एलईडी हेडलाइट, 5-इंचाची टीएफटी इन्फो फ्लॅट स्क्रीन देण्यात आली आहे. या स्क्रीनमध्ये तुम्हाला अनेक मोड्स मिळतील. जे रायडरला त्याच्या सोयीनुसार बदलता येणार आहे. राइडिंग किलोमीटर, रायडिंग मोड, मॅक्झिमम स्पीड, घोषणा, तापमान यासह अनेक माहिती स्क्रीनवर मिळेल.
या बाईकची सुरूवातीची किंमत 2.85 लाख रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते. त्याच वेळी, त्याच्या स्टाईल स्पोर्ट व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. लॉन्चसोबतच कंपनीने प्री-बुकिंगही सुरू केले आहे. बीएमडब्ल्यूची ही बाईक तुम्हाला ईएमआयवरदेखील खरेदी करता येईल.
3999 रूपयांच्या ईएमआयवर 2022 BMW G 310 RR बाईक खरेदी करण्याची ऑफर कंपनीनं दिली आहे. तुम्ही आवश्यक डाऊनपेमेंट करून कमी ईएमआयवर स्टँडर्ड, बलून आणि बुलेट प्लॅन अँतर्गत ही खरेदी करू शकता. यादरम्यान कंपनी अनलिमिटेड किलोमीटरचीही वॉरंटी देत आहे. ग्राहकांना बाईकटी वॉरंटीही एक्स्टेंड करता येईल.