BMW launches BMW F 850 GS Adventure in India; You will have the courage to see the price!
BMWची 'अॅडव्हेंचर' बाईक भारतात लाँच; किंमत पाहण्यासाठी 'धाडस' लागेल! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:08 PM2019-05-14T17:08:05+5:302019-05-14T17:14:42+5:30Join usJoin usNext जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनी BMW ने दुचाकी क्षेत्रात नवीन अॅडव्हेंचर बाईक लाँच केली आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमतच 15.40 लाख रुपये आहे. या बाईकचे नाव BMW F 850 GS Adventure असे आहे. कंपनीने आजपासूनच बुकिंगही सुरु केली आहे. ही बाईक क्लासिक अॅडव्हेंचर टूररसारखी दिसते. या बाईकला पुढे 21 इंचाचा आणि मागे 17 इंचाचे क्रॉस स्पोक व्हील देण्यात आले आहेत. अॅडव्हेंचर बाईकमध्ये हायमाउंटेड एग्जॉस्ट आणि फ्रंट व्हील व स्पोकवर गोल्ड फिनिश देण्यात आला आहे. इंधन टाकी 23 लीटरची आहे जी F 850 GS पेक्षा 8 लीटर जास्त आहे. ही बाईकमध्ये क्रॅश प्रोटेक्शन देण्यात आले असून वजन 244 किलो आहे. एफ 850 जीएस अॅडव्हेंचरमध्ये एलईडी हेडलाईट्स, अॅडजेस्टेबल विंड स्क्रीन, अॅडजेस्टेबल रिअर ब्रेक आणि गिअर लिव्हर, बॅश प्लेट देण्यात आले आहेत. 6.5 इंचाचा टीएफटी डिस्प्लेही देण्यात आला आहे. यामध्ये स्मार्टफोन जोडता येऊ शकतो. बाईकमध्ये अॅटोमॅटीक स्टॅबिलिटी कन्ट्रोलसोबत रेन आणि रोड रायडिंग मोड्स स्टँडर्ड देण्यात आले आहेत. शिवाय डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल (DTC) आणि बीएमडब्ल्यूच्या एबीएस प्रो प्रणालीसोबत डायनॅमिक आणि एंड्युरो असे दोन पर्यायी रायडिंग मोड दिले आहेत. या अॅडव्हेंचर बाईकचे इंजिनच ताकदवान आहे. या बाईकला 853cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,250rpm वर 95hp ची ताकद आणि 6,250rpm वर 92Nm टॉर्क देते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सचे आहे. तर बाईकचा सर्वाधिक वेग 197 किमी प्रति तास आहे.टॅग्स :बीएमडब्ल्यूमोटारसायकलBmwmotercycle