BSNL in New Business; Will try luck from Maharashtra to build Charging stations for Electric Vehicle
तोट्यातली बीएसएनएल नव्या व्यवसायात; महाराष्ट्रातून नशीब आजमावणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:47 PM2020-01-07T17:47:38+5:302020-01-07T17:50:45+5:30Join usJoin usNext भारत सरकारची तोट्यात असलेली कंपनी बीएसएनएल नव्या व्यवसायामध्ये नशीब आजमावत आहे. बॅटरी स्वॅपिंग आणि वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी दिल्लीच्या EVI Technologies (EVIT) सोबत करार केला आहे. देशभरात तब्बल 5000 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलवरचा खर्च आणि पर्यावरण रक्षणासाठी वीजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी धडपड करत आहे. मात्र, पुरेशी चार्जिंग स्टेशन आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने कार कंपन्यांनी याकडे टाळाटाळ चालविली आहे. इलेक्ट्रीक कार या कमी रेंजच्या आणि महाग असल्याने सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. यामुळे या इलेक्ट्रीक कारना मागणीही कमीच आहे. त्यातच चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याचाही फटका मागणीवर पडत आहे. यासाठी सरकारी कंपनी बीएसएनएलनेच पुढाकार घेतला आहे. ईव्हीआय ही स्टार्टअप कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी इंफ्रास्ट्रक्चर पुरविणारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये 10 वर्षांचा करार झाला आहे. याद्वारे ही कंपनी बीएसएनएलच्या मालकीच्या जागांवर देशभरात जवळपास 5000 ठिकाणांवर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यामध्ये बॅटरी अदलाबदल आणि चार्जिंगची सुविधाही असणार आहे. यामध्ये ईव्हीआय कंपनीच गुंतवणूक करणार आहे. तर बीएसएनएल केवळ जागा आणि विजेची सुविधा पुरविणार आहे. महत्वाचे म्हणजे पुढील महिन्यापासूनच ही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असून महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये याची सुरुवात केली जाईल. पहिले स्टेशन महाराष्ट्रातच उभारले जाणार असल्याचे बीएसएनएलचे महाराष्ट्र मुख्य प्रबंधक कुंगमार मिश्रा यांनी सांगितले.टॅग्स :बीएसएनएलवीजेवर चालणारं वाहनइलेक्ट्रिक कारमहाराष्ट्रBSNLelectric vehicleElectric CarMaharashtra