१ लाख डाऊनपेमेंटवर ७ सीटर Ertiga खरेदी करा; कर्ज आणि EMI किती असेल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:34 PM2022-12-13T12:34:48+5:302022-12-13T12:37:29+5:30

मारुती सुझुकी एर्टिगा भारतीय बाजारपेठेत LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिममध्ये एकूण 9 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्याच्या किमती रु. 8.35 लाख ते रु. 12.79 लाख (एक्स-शोरूम) आहेत. मारुतीची ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. जी MPV 1462 cc पेट्रोल इंजिन तसेच CNG मध्ये उपलब्ध आहे.

एर्टिगाचे मायलेज 20.51 kmpl ते 26.11 km/kg आहे. मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली ही ७ सीटर कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी MPV आहे. चला, आम्‍ही तुम्‍हाला मारुती एर्टिगाचे बेस मॉडेल Ertiga LXI आणि सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल Ertiga VXI चं बजेट सांगतो.

Maruti Suzuki Ertiga चे बेस मॉडेल Ertiga LXI ची एक्स-शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 9,36,935 रुपये आहे. तुम्ही Ertiga LXI ला रु. 1 लाख (ऑन-रोड प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याच्या EMI सह) डाउनपेमेंटसह कर्ज घेत असल्यास तुम्हाला 8,36,935 रुपये कर्ज मिळेल.

जर कार कर्जावरील व्याज दर 9 टक्के असेल, तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 17,373 रुपये मासिक हप्ता म्हणून भरावे लागतील. मारुती एर्टिगाच्या बेस मॉडेलला फायनान्स करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांमध्ये 2 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.

Maruti Suzuki Ertiga चे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल, Ertiga VXI ची एक्स-शोरूम किंमत 9.49 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 10,63,110 रुपये आहे. जर तुम्ही मारुती एर्टिगा VXI ला 1 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह कर्ज घेणार असाल तर तुम्हाला 9,63,110 रुपये कर्ज घ्यावे लागेल

जर तुम्हाला 9% व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज मिळाले तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी 19,993 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. मारुती एर्टिगाच्या या टॉप सेलिंग मॉडेलला फायनान्स करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांसाठी 2.36 लाख रुपये व्याज भरावे लागेल.

मारूती एर्टिगाच्या या दोन प्रकारांपैकी एक व्हेरिएंट खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही जवळच्या मारुती सुझुकी डीलरशिपला भेट दिली पाहिजे आणि कारचे कर्ज आणि EMI तपशील तपासा. प्रत्येक शहरानुसार कारच्या किंमतीत चढउतार होत असतात.

एर्टिगा या कारमध्ये स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, अँड्राइड ऑटो अन् अॅपल कार प्लेसारख्या फीचर्सचा समावेश आहे. पुढच्या दोन सीटसाठी दोन एअरबॅग्स देण्यात आल्या असून, ABS आणि EBD सारख्या तंत्रज्ञानानं युक्त आहेत.

देशातील सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही मारुती सुझुकी एर्टिगा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये मारुती एर्टिगाच्या (Maruti Ertiga) एकूण 10494 युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे एर्टिगा आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.

नवीन एर्टिगा सीएनजीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 1.5-लीटर K15C DualJet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे पूर्णपणे 87 hp ची पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. पेट्रोल मोडमध्ये ते 100 एचपी पॉवर जनरेट करते.

टॅग्स :मारुतीMaruti