Buying an electric two wheeler is expensive; Read prices of 5 bikes with OLA, Ather
इलेक्ट्रिक टू व्हिलर खरेदी करणं महागलं; OLA, Ather सह ५ बाईकच्या किंमती वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 10:46 AM2023-06-03T10:46:07+5:302023-06-03T10:50:18+5:30Join usJoin usNext इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी FAME-2 अंतर्गत सबसिडी कमी केल्यानंतर, या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइकच्या किमती वाढल्या आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाने नुकताच सबसिडी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि विशेषत: FAME-2 (फास्टर अॅडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ईव्ही) कार्यक्रमांतर्गत खरेदीदारांना देण्यात येणाऱ्या सबसिडीला लक्ष्य केले होते. इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी कमाल सबसिडी कॅप, जी ईव्ही दुचाकीच्या एक्स-फॅक्टरी किमतीच्या ४०% होती, ती आता १५% पर्यंत कमी करण्यात आली आहे. आता Ola Electric, TVS, Ather, Matter, Ampere, Okaya EV सारख्या कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइकच्या किमती वाढवल्या आहेत. ओला इलेक्ट्रिकने FAME 2 सबसिडी कपात केल्यानंतर त्यांच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती १० हजार ते १५ हजारापर्यंत वाढवण्याची घोषणा केली. आता Ola S1 Air च्या 3 kWh बॅटरी पॅकची किंमत १०००० रुपयांनी वाढून १,०९,९९९ रुपये झाली आहे. तर, Ola S1 आणि S1 Pro ची किंमत १५००० रुपयांनी वाढून अनुक्रमे १,२९,९९९ रुपये आणि १,३९,९९९ रुपये करण्यात आली आहे. Ather 450X ची किंमत ३०,२८५ रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे त्याची किंमत आता १,१६,३७९ रुपयांवरून १,४६,६६४ रुपयांपर्यंत वाढली आहे. 450X प्रो पॅकची किंमत १,४६,७४३ रुपयांवरून १,६७,१७८ रुपये करण्यात आली आहे. या एक्स-शोरूम दिल्ली किमती आहेत, ज्यात FAME-II सबसिडी समाविष्ट आहे. TVS मोटर कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube ची किंमत रु. १७००० ते २२००० पर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन किमती १ जून २०२३ पासून लागू झाल्या आहेत. हिरो इलेक्ट्रिकने एक निवेदन जारी करत म्हटलं की, आम्ही आमच्या स्कूटरच्या किमती वाढवणार नाहीत, कारण कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर वाहनांना प्रोत्साहन देणे आणि वाहन उत्पादनाच्या खर्चाबाबत गैरसमज दूर करण्यास समर्पित आहे. Mater Era या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आली होती आणि पहिल्या ५००० युनिट्ससाठी १.४४ लाख रुपये आणि ५००० पेक्षा जास्त युनिट्ससाठी १.५४ लाख रुपये किंमत ठेवली. मात्र, ६ जूनपासून, Mater Aira साठी ३० हजार रुपयांची वाढ होणार आहे, जी अनुक्रमे १.७४ लाख ते १.८४ लाख रुपये किंमत एक्स-शोरूम असेल. ओकाया ईव्हीनेही त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती वाढवल्या आहेत. ओकाया फास्ट एफ4 इलेक्ट्रिक स्कूटरवर सबसिडी आधी ६६ हजार रुपये होती, परंतु सरकारच्या धोरणात बदल झाल्यामुळे, आता कमाल अनुदानाची रक्कम २२५०० रुपये झाली आहे. Okaya Fast F4 ची एक्स-शोरूम किंमत आता १,३९,९५१ रुपये झाली आहे. तर, फास्ट F3 ची किंमत १,२९,९४८ रुपये, फास्ट F2B ची किंमत १,१०,७४५ रुपये आणि फास्ट F2T ची किंमत १,०७,९०३ रुपये आहे. अँपिअर इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत २०९०० ते ३९१०० रुपयांपर्यंत आहे. सर्वात परवडणारी Zeal EX आता २०९०० रुपयांनी महाग झाली आहे. Ampere Zeal EX ची नवीन किंमत रु. ९५९०० आहे. Ampere Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत २१००० रुपयांनी वाढवून १,०४,९०० रुपये करण्यात आली आहे. अँपिअर प्राइमसला सर्वाधिक ३९१०० रुपयांची वाढ मिळाली असून आता त्याची किंमत १.४९ लाख रुपये आहे.टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरelectric vehicle