BYD Atto 3: जाम भारी! 521KM रेंज वाली इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, फक्त 50 हजारात करा बुकिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 05:02 PM2022-10-11T17:02:39+5:302022-10-11T17:17:06+5:30

BYD Atto 3 Launch: भारतात या गाडीची स्पर्धा MG ZS EV आणि Hyundai Kona EV सारख्या गाड्यांसोबत असेल.

BYD Atto 3 Price and Features: चीनी कार कंपनी BYD (Build Your Dreams) ने भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार BYD Atto 3 लॉन्च केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फुल चार्जमध्ये 521KM ची रेंज देईल. कंपनीने या गाडीची किंमत अद्याप सांगितलेली नाही.

पण, याची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. ग्राहक फक्त 50 हजार रुपयांमध्ये ही गाडी बूक करू शकतात. याच्या किमतीची घोषणा डिसेंबरमध्ये होण्याचा अंदाज आहे. भारतात BYD Atto 3 चा सामना MG ZS EV आणि Hyundai Kona EV सारख्या गाड्यांसोबत असेल.

या गाडीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, गाडीला समोरुन एलईडी हेडलँप्ससोबत कनेक्टिंग LED बार दिले आहेत. याशिवाय समोर सेंसर्स आहेत. परंतू, यात फॉगलँप्स दिले नाहीत. गाडीत 18 इंचाचे अलॉय व्हील आहेत.

Atto 3 ची लांबी 4455mm, रुंगी 1875mm आणि उंची 1615mm आहे. याचे व्हीलबेस 2720mm आहे. ही गाडी चार कलर ऑप्शन ब्लू, बोल्डर ग्रे, स्की व्हाइट आणि पार्कौर रेडमध्ये मिळेल.

गाडीतील टेक्नॉलॉजीबद्दल सांगायचे झाल्यावर, गाडीत Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसह 12.8-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे. या

तर फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील्स, 5-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरमिक सनरूफ, 6-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 4-वे अॅडजस्टेबल फ्रंट पॅसेंजर सीट आणि व्हायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स मिळतील.

BYD Atto 3 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 60.48kwh ची बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी ARAI सर्टिफाइड 521 KM ची रेंज ऑफर करते. पॉवरबाबत सांगायचे झाल्यास, याची मोटर 201bphची पॉवर आणि 310Nm चा टॉर्क जेनरेट करते.

कंपनीने सांगितले की, गाडीत ब्लेड बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान इतर बॅटरींच्या तुलनेत जास्त सुरक्षित आहे. या गाडीला डीसी फास्ट चार्जरने 0 ते 80 टक्के चार्ज करण्यासाठी फक्त 50 मिनीटांचा वेळ लागेल.

कारमध्ये लेव्हल 2 ADAS सिस्टीम दिले आहेत, ज्यात अॅडॅप्टिप क्रूज कंट्रोल आणि इमेरजेंसी ब्रेकिंगसारखे फीचर्स आहेत. एखादा व्यक्ती कारच्या समोर आल्यावर, गाडी आपोआप ब्रेक लावते. यात टेलगेटसाठी इलेक्ट्रिक ओपनिंग मिळते.

सेफ्टीसाठी नवीन BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV मध्ये 7 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, सीट बेल्ट रिमायंडर सिस्टीम आणि स्पीड अलर्ट सिस्टीम दिले आहेत.