Car Care Tips: नवी असो, जुनी असो! दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये नक्की कार काम देणार; ही काळजी जरूर घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:43 PM2021-06-01T12:43:16+5:302021-06-01T12:56:54+5:30

Car Care Tips in Lockdown, Car Care Tips after Lockdown: अनेकांच्या स्कूटर, बाईक, कार या कित्येक दिवसांपासून बंदच आहेत. मारलाच एखादा फेरफटका जवळच्या दुकान, मेडिकल किंवा दवाखान्यापर्यंत. त्यापुढे न गेल्याने ही वाहने आधीच गेली वर्षभर कमी चालली आहेत, त्यामुळे गेल्या लॉकडाऊनमध्ये काही काम दिले नाही तरी या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे.

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून अधिक काळ लॉकडाऊन (Lockdown affect on Car, bike) सुरु आहे. देशभरातही अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे. घरातून काम करावे लागत असल्याने आणि सगळे बंद असल्याने रोज तुम्ही तुमचे वाहन बाहेर काढत होता, ते आता होत नाही. (How to take care of your car in Second Lockdown? follow these tips)

अनेकांच्या स्कूटर, बाईक, कार या कित्येक दिवसांपासून बंदच आहेत. मारलाच एखादा फेरफटका जवळच्या दुकान, मेडिकल किंवा दवाखान्यापर्यंत. त्यापुढे न गेल्याने ही वाहने आधीच गेली वर्षभर कमी चालली आहेत, त्यामुळे गेल्या लॉकडाऊनमध्ये काही काम दिले नाही तरी या लॉकडाऊनमध्ये तुम्हाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. (your Car will break down in Lockdown or After Lockdown.)

यासाठी काही काळजी घ्यावी लागणार आहे. पेट्रोल गाडी असेल तर आठवड्यातून एकदा आणि डिझेल असेल तर तीन-चार दिवसांतून एकदा स्टार्ट मारून 15 -20 मिनिटे निदान न्युट्रलवर सुरु ठेवावी. म्हणजे कारचे इंजिन सुस्थितीत राहील.

पेट्रोल गाड्यांची इंजिने लगेचच सुरु होतात, परंतू डिझेल इंजिने सुरु होण्यासाठी जास्त बॅटरी खर्च करावी लागते. यामुळे तुमची बॅटरी सुस्थितीत आहे का? हे तुम्हाला एकदातरी तपासणे गरजेचे आहे. बॅटरीमध्ये पाण्याची लेव्हल योग्य आहे का? हे तपासावे लागेल. नाहीतर उभ्या उभ्याच बॅटरी कधी संपेल सांगता यायचे नाही, आणि जेव्हा तुम्हाला खरी गरज असेल तेव्हा गाडी मिळायची नाही.

तुम्ही शहरात असाल आणि जर तुमच्या बिल्डिंगमध्ये मोकळी जागा असेल तर गाडी चालू करून दोन-चार फेऱ्या जरूर मारा. पावसाळा येत आहे. यामुळे एकाच जागी गाडी उभी असल्यास जंग लागण्याची शक्यता आहे. खुप दिवसांनी गाडी बाहेर काढली तर एक्सेल गच्च होण्याची शक्यता आहे.

जर तुमच्या कारचे इंजिन सुरु केले असेल आणि ते तसेच ठेवून 15-20 मिनिटे झाली असतील तर गाडीचा एसी ऑन करा. यामुळे एसी व्हेंट साफ होण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, गाडी बरेच दिवस बंद असेल आणि बाहेर काढली तर लगेचच एसी सुरु करू नका, बॅटरी, इंजिनवर लोड येईल आणि परिस्थिती बिघडेल.

कारच्या आतमध्ये खेळती हवा सुरु राहण्यासाठी कार बंद असताना खिडक्या एका इंचाने उघड्या ठेवा. जर रस्त्यावर कार पार्क असेल तर आठवड्यातून तास-दोन तास खिडक्या उघडा आणि जातीने लक्ष ठेवा.

खूप दिवसांपासून कार कव्हरने झाकलेली असेल तर आतमध्ये धूळ जमा होऊ लागते. अशावेळी कारवरील कव्हर आठवड्यातून एकदा काढावे आणि धूळ साफ करावी. नाहीतर ही धूळ कारच्या रंगावर ओरखडे आणू शकते. तसेच खाचा-खोचांमध्ये अडकून कार गंज पकडू शकते.

कार खूप काळ एकाच जागी उभी राहिल्यास टायरमधील हवा कमी होऊ लागते. तसेच टायरही खराब होऊ लागतात. यामुळे कमीतकमी 15 दिवसांतून एकदा टायरमधील हवा तपासावी. गरज असल्यास तुम्ही इलेक्ट्रीक पंप घेऊ शकता. दुचाकीस्वारांनीही हवा चेक करावी.

आज एक टायर हा 4000 रुपयांपासून पुढे सुरु होतो. जर तुमची कार दोन-तीन वर्षे चालली असेल आणि आता वर्षभर बंद असेल तर तुम्हाला टायर धोका देऊ शकतात. एकतर वाहन चालविताना टायर फुटू शकतात किंवा कातरे पडू शकतात. असे दिसत असेल तर कारचा टायर बदललेला कधीही सुरक्षित. नाहीतर अपघात झाल्यास तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो.

जर तुमच्याकडे दुचाकी आहे आणि ती तुम्ही आठवड्याभराने सुरु करत असाल तर कधीही इलेक्ट्रीक स्टार्ट करू नका. किक स्टार्ट करा. हे करताना चोक द्या. यामुळे बाईकचे इंजिन आणि बॅटरी चांगली राहिल.

कोरोना काळात तुम्ही घरातच असाल असे नाही. कोणी आजारी असल्यास, दूध, भाजीपाला संपल्यास किंवा अन्य काही कामासाठी बाहेर गेलाच असाल. किंवा वारंवार जावे लागत असेल तर घरी आल्यावर कार सॅनिटाईज जरूर करा. कार कशी सॅनिटाईज करायची याची माहिती आम्ही य़ाआधी दिली आहे. तरी देखील पुन्हा याची लिंक शेअर केली जाईल. https://www.lokmat.com/photos/auto/how-disinfect-car-corona-virus-see-hot-spot-having-virus-a607/