Cheap and Mast Cruiser Bike in the Indian Market ...
या आहेत भारतीय बाजारातील स्वस्त आणि मस्त क्रुझर बाईक... By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 05:12 PM2018-08-22T17:12:06+5:302018-08-22T17:18:04+5:30Join usJoin usNext भारतातील क्रुझर स्टाईलच्या मोटरसायकल्सची मोठी क्रेझ आहे. अगदी लाखात ते लाखांच्या घरामध्ये या बाईक असल्या तरीही खिशाला परवडणाऱ्या बाईक्स भाव खाऊन जात आहेत. चला पाहुया या बाईक्स कोणत्या आहेत. बजाज अॅव्हेंजर स्ट्रीट 180 ही भारतात विकली जाणारी सर्वात परवडणारी क्रुझर आहे. या बाईकची किंमत 85,613 एक्स शोरुम मुंबई आहे. बजाजची दुसरी परवडणारी क्रुझर Avenger Cruise 220 आहे. या बाईकमध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे. तसेच समोर मोठी विंडस्क्रीन दिलेली आहे. स्पोक वील, क्रोमयुक्त आरसे असलेल्या या बाईकची किंमत 94,707 आहे. भारतात नुकतीच लाँच झालेली सुझुकीची इंट्रुडर ही बाईकने बाजारात हवा केली होती. या बाईकचे डिझाईन लोकांनी खूप पसंत केले. या बाईकची किंमत 1 लाख 2 हजार रुपये आहे. तर फ्युअल इंजेक्टर असलेल्या मॉडेलची किंमत जास्त आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय बुलेटही या क्रुझर श्रेणीमध्ये येते. क्लासिक 350 हे मॉडेलतर पाण्यासारखे विकले जाते. या बाईकची किंमत 1 लाख 16 हजार रुपयांपासून सुरु होते.टॅग्स :टू व्हीलरवाहन उद्योगबजाज ऑटोमोबाइलtwo wheelerAutomobile Industrybajaj automobile