4 वर्षांहून अधिक वयाच्या लहानग्यांना आता हेल्मेटसक्ती; जाचक नियमांचा वाहनचालकांवर भडिमार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 04:31 PM2019-08-02T16:31:00+5:302019-08-02T16:36:45+5:30

रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारनं मोटर वाहन(संशोधन) विधेयक 2019ला मंजुरी दिली आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानं आता वाहन चालकांना या जाचक नियमांचा सामना करावा लागणार आहे.

एखाद्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी पकडल्यास वाहनाच्या मालकांला तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. त्या गाडीच्या मालकाला 25 हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जाणार आहे.

दारू पिऊन गाडी चालवल्यास आतापर्यंत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. आता त्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जात होता, आता तो हजार रुपयांचा दंड 5 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

गाडी चालवताना फोनवर बोलणंही आता महागात पडू शकते. गाडी चालवत असताना फोनवर बोलल्यास आधी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जात होता. तोच आता वाढवून 5 हजार रुपये करण्यात आला आहे.

सीट बेल्ट न वापरल्यास मोठा भुर्दंड द्यावा लागणार आहे. सीट बेल्ट लावलेला नसल्यास आधी 100 रुपये दंड द्यावा लागत होता. आता तोच दंड एक हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

टॅग्स :वाहनAutomobile