Nexon EVशी थेट स्पर्धा; लवकरच लॉन्च होणार 'ही' दमदार Electric XUV, पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 08:51 PM2022-09-28T20:51:27+5:302022-09-28T20:57:12+5:30

या गाडीची 58 सेकंदाची जाहिरात आली असून, यात गाडीची पॉवर आणि फीचर्स पाहायला मिळत आहेत.

Mahindra Electric Car: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. यातच आता भारतातील आग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी Mahindra आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV XUV400 च्या लॉन्चिंगसाठी सज्ज झाली आहे.

कंपनीने या गाडीची पहिली TVC अॅड आणली आहे. 58 सेकंदाच्या या अॅडमध्ये XUV400 इलेक्ट्रिकची दमदार पॉवर आणि फीचर्स पाहायला मिळत आहेत. अॅड पाहून स्पष्ट झाले आहे की, याची थेट स्पर्धा Tata Nexon EV प्राइस आणि Nexon EV मॅक्ससोबत असणार आहे.

महिंद्राची ही लेटेस्ट SUV eXUV300 कॉन्सेप्टवर आधारित आहे. याला कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये शोकेस केले होते. ही इलेक्ट्रिक गाडी लॉन्च होणार आहे, पण याच्या लॉन्चिंगची तारीख अद्याप कंपनीने सांगितलेली नाही. महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकची टेस्ट ड्राइव्ह डिसेंबर 2022 पासून सुरू होऊ शकते.

याची किंमत आणि बुकिंग जानेवारी 2023 पासून सुरू होईल. काही रिपोर्ट्सनुसार, कंनी जानेवारीपासून या SUV ची डिलिव्हरी सुरू करेल. पहिल्या स्टेजमध्ये महिंद्रा XUV400 EVला देशातील 16 शहरांमध्ये लॉन्च केले जाईल. यात दिल्ली, NCR, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, पुणे, अहमदाबाद, गोवा, जयपूर, सूरत, नागपूर, त्रिवेंद्रम, नाशिक, चंडीड आणि कोच्चीचा समावेश आहे.

महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिकमध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटन आहे. यात ड्राइव्ह, रिव्हर्स आणि न्यूट्रलसाठी एक गिअरबार मिळले. यात एक राउंड स्पीडोमीटरदेखील असेल, ज्यात 180km/h पर्यंतची स्पीड मेंशन केली जाईल. कारचे बूट स्पेसदेखील खूप चांगले आहे. यात चार फूल साइज बॅग आरामात बसू शकतात. कारमध्ये एक सनरुफदेखील मिळेल. डॅशबोर्डवर मोठी स्क्रीन असलेले इन्फोटेनमेंट सिस्टीमदेखील मिळेल.

XUV400 मूळात ICE-बेस्ड XUV300 चे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. यात उलट्या L आकाराचे LED DRLs, हेडलँप, साइड प्रोफाइलसारखे साम्य आहे. काही वेगळ्या फीचर्समध्ये क्लोज-ऑफ फ्रंट ग्रिल, ब्रॉन्ज फिनिशसोबत महिंद्राचा नवीन ट्विन पीक्स लोगो आणि एक्स-आकारचा एलिमेंट सामील आहे. XUV400 मध्ये रिवाइज्ड टेल लँपदेखील मिळेल. या गाडीच्या किमतीबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.