मस्तच! बिना लायसन कार चालवा; सर्वात छोटी आणि स्वस्त कार लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 08:34 PM 2020-03-03T20:34:37+5:30 2020-03-03T20:44:49+5:30
Citroen Ami ही छोटी सीटी कार आहे. ही कार light quadricycle या प्रकारातील आहे. ही कार फ्रान्समध्ये 14 वर्षांची मुले आणि युरोपमध्ये 16 वर्षे वयाची मुले बिना लायसन्स चालवू शकतात. एमी एका खेळण्यातल्या कारसारखी दिसते. यामध्ये दोन जणांना बसण्यासाठी जागा आहे. गर्दीच्या भागात ही कार एकदम उपयोगी आहे.
फ्रान्सची ऑटोमोबाईल कंपनी Citroen (सिट्रॉन) ने जगातील सर्वात छोटी आणि स्वस्त कार लाँच केली आहे. या कारचे नाव एमी असे आहे. ही कार जगात क्रांती आणू शकते. ही कार सर्वात आधी युरोपच्या बाजारात लाँच केली जाणार आहे.
Citroen Ami ही छोटी सीटी कार आहे. ही कार light quadricycle या प्रकारातील आहे. ही कार फ्रान्समध्ये 14 वर्षांची मुले आणि युरोपमध्ये 16 वर्षे वयाची मुले बिना लायसन्स चालवू शकतात.
ही कार दिसायला वॉशिंग मशीनसारखी दिसत असून कार जास्त वेगानेही धावत नाही.
युरोपीय बाजारामध्ये एमी या 100 टक्के इलेक्ट्रीक कारची किंमत जवळपास 6000 डॉलर म्हणजेच 4.76 लाख रुपये आहे.
ही कार Ami One Concept हे उत्पादनपूर्व मॉडेल आहे. म्हणजेच या कारमध्ये आणि लाँच होणाऱ्या कारमध्ये काहीही फरक असणार नाही.
ही कार गेल्या वर्षीच्या जिनिव्हा मोटर शोमध्ये दाखविण्यात आली होती. ही कार फ्रान्समध्ये 2020 च्या शेवटाला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
महत्वाचे म्हणजे कंपनीने एक अनोखी ऑफर लाँच केली आहे. ही कार मासिक भाड्यानेही मिळणार आहे.
Ami ला 22 डॉलर म्हणजेच 1500 रुपयांच्या सदस्य शुल्कावर मिळणार आहे. तसेच भाड्यानेही देण्यात येणार आहे.
ही कार Free2Move कार शेअरिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने मिनिटाच्या हिशेबानेही भाड्याने घेता येते. यासाठी मिनिटाला 20 रुपये आकारले जातात.
Citroen Ami चा आकार आकर्षक आहे. लांबी 2410 एमएम, रुंदी 1390 mm, उंची 1520 mm आहे. छोटी कार असली तरीही या कारला 14-इंचाची चाके देण्यात आली आहेत.
मात्र, या कारमध्ये पॅनारोमिक सनरुफ देण्यात येणार आहे. साईड विंडो मॅन्युअल आहेत.
या कारच्या बॅटरीची रेंज 70 किमी असून 5.5 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. या कारला 6 kW मोटर देण्यात आली आहे. या कारचा वेग 45 किमी आहे. या कारला तीन तासांत चार्ज केले जाऊ शकते.