Diesel price only Rs 1.63 in Iran; You will remember days of 20 years back
इथे मिळतेय अवघ्या 1.63 रुपयांत डिझेल; तुम्हाला 20 वर्षांपूर्वीची आठवण येईल By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:01 PM2020-01-02T15:01:55+5:302020-01-02T15:05:26+5:30Join usJoin usNext भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी आकाश गाठले आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे लोकांनी खासगी वाहनातून फिरणेही बंद केले आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका जागेबाबत सांगणार आहोत, जेथे डिझेल दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीला मिळत आहे. याठिकाणी डिझेल अवघ्या 1.63 रुपयांना विकले जाते. हा दर जगातील सर्वात कमी आहे. इराण हा असा देश आहे की ज्याच्यावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. याच देशाकडून भारताला मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. या देशात कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले जात असल्याने येथील इंधनाच्या किंमती खूप कमी आहेत. सौदी अरबही तेलाचे उत्पादन घेतो. या देशाची कंपनी सौदी अरामको ही जगातील सर्वाधिक तेलाचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. मात्र, तरीही या देशात एक लीटर डिझेलसाठी लोकांना 8.93 रुपये मोजावे लागतात. यानंतर तिसऱ्या स्थानावर अल्जिरिया हा देश आहे. ये देशात डिझेलचा दर 13.79 रुपये आहे. याचबरोबर पेट्रोलचे दरही कमी आहेत. इराण, सौदी आणि अल्जिरियानंतर जगात सर्वात कमी किंमतीत डिझेल सुदानमध्ये विकले जाते. सुदान हा ऑफ्रिकेतील देश आहे. येथे 13.90 रुपयांना डिझेल मिळते. इक्वेडोर हा देश दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. येथे एका लीटर डिझेलची किंमत 19.52 रुपये आहे. टॅग्स :पेट्रोलडिझेलइराणPetrolDieselIran