Diesel Vs Hybrid: डिझेल कार घ्यावी की त्याच पैशांत हायब्रिड कार? संपूर्ण माहिती, तुमच्यासाठी कोणती फायद्याची... By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:32 PM 2022-11-22T17:32:16+5:30 2022-11-22T17:34:35+5:30
गेल्या दोन वर्षांपासून इंधनाचे दर शंभरीपार नंतर शंभराच्या आसपास रेंगाळत राहिले आहेत. साठ-सत्तरवर पेट्रोल, डिझेलची किंमत पाहूनही आता जमाना झाला आहे. आता लोकांना या वाढलेल्य़ा दरांची सवयच झालीय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. गेल्या दोन वर्षांपासून इंधनाचे दर शंभरीपार नंतर शंभराच्या आसपास रेंगाळत राहिले आहेत. साठ-सत्तरवर पेट्रोल, डिझेलची किंमत पाहूनही आता जमाना झाला आहे. आता लोकांना या वाढलेल्य़ा दरांची सवयच झालीय, असे म्हटले तर वावगे ठरू नये. यामुळे भविष्यातही हे दर वाढतील पण कमी होणार नाहीएत. अशावेळी नवीन कार घेताना पेट्रोल कार घ्यायची की डिझेल यावरून द्वंद्व सुरु आहे. इलेक्ट्रीक कार तर आपल्या आवाक्यापासून दूर आहेत.
कंपन्या आता नवीन तंत्रज्ञानाच्या कार लाँच करत आहेत. यामध्ये हायब्रिड कार येत आहेत. म्हणजेच नॉर्मल पेट्रोल इंजिन जेवढे मायलेज देते त्यापेक्षा जास्तीचे मायलेज या कार देत आहेत. एयसुव्हीसारख्या कार या तंत्रज्ञानातून डिझेलच्या सेदान कारपेक्षाही जास्त मायलेज देत आहेत. अशावेळी तुम्ही रनिंग जास्त असले तरी डिझेल कार घ्यावी की पेट्रोल यावरविचार करायला हवा.
हायब्रिड कारचा सर्वात मोठा फायदा म्हमजे या कार नवीन तंत्रज्ञानाने येतात. यामध्ये इंजिनासोबत एक मोटर असते, यामध्ये कार एका निश्चित वेगाने चालत असेल तर कोणत्याही इंधनाची गरज लागत नाही. ही कार इलेक्ट्रीक मोटरवर त्या वेगात चालत राहते. या कार सामान्य कारपेक्षा जास्त मायलेज देतात. पेट्रोल इंजिनसोबतच हे तंत्रज्ञान वापरले जाते.
हायब्रिड कारचा मोठा तोटा म्हणजे, हायब्रिड कार जास्त मायलेज देत असतात. परंतु जेव्हा त्यांच्यातील बॅटरी खराब होते, तेव्हा ती बदलणे खूप महाग ठरते. बाजारात कमी पर्यायांमुळे अशा कार इतरांपेक्षा महाग असतात.
पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कार खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आजही देशात पेट्रोलपेक्षा डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे डिझेल कार खरेदी केल्यानंतर कमी खर्चात डिझेल कार चालवता येते. डिझेल कारचे इंजिन इतर प्रकारच्या इंधनापेक्षा खूप शक्तीशाली असते. त्यामुळे अशा गाड्या जास्त वजन सहन करू शकतात.
डिझेल इंजिन गाड्यांमुळे जास्त प्रदूषण होते, त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होते. पेट्रोल आणि हायब्रीड कारच्या तुलनेत डिझेल कारचा देखभाल खर्च अधिक आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या कार महाग आहेत. त्यात आणखी पैसे टाकले तर हायब्रिड कार येते.