34 Kmpl मायलेज अन् 5.55 लाख किंमत; या फॅमिली कारवर 50 हजारांचा डिस्काउंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 14:30 IST2023-07-19T14:25:51+5:302023-07-19T14:30:19+5:30
Discount on WagonR : देशातील सर्वात लोकप्रिय मारुती सुझुकी Wagon R वर 31 जुलैपर्यंत बंपर डिस्काउंट मिळतोय.

Discount on Wagon R: भारतीयांमध्ये मारुती सुझुकीच्या WagonR कारची जबरदस्त क्रेझ आहे. भारतातील बहुतांश मध्यमवर्गीयांची वॅगनआर कारला पहिली पसंती असते.
गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने या कारने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आपली जागा कायम ठेवली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, या कारची किंमत, मायलेज आणि या कारमध्ये मिळणारी जागा.
या कारची प्रचंड मागणी पाहता कंपनीने या कारवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. कारची किंमत 5.55 लाख रुपये(एक्स-शोरुम)पासून सुरू होते. ही कार दोन इंजिन ऑप्शन आणि CNG व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारचे सीएनजी व्हेरिएंट 34 किमी प्रती किलो मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
मारुती सुझुकी जुलैमध्ये Wagon R वर 50,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. कारच्या मॅन्युअल आणि CNG व्हेरिएंटवर 25,000 रुपयांची रोख सवलत, 20 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे.
कंपनी कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 15,000 रुपयांची रोख सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. कंपनी कारचे चार प्रकार देते, ज्यात LX i, VX i, Z X i आणि ZX i Plus आहे. कारमध्ये 1.0 आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळते.
कारचे सीएनजी मॉडेल केवळ 1.2 लिटर इंजिन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 89 बीएचपी पॉवर जनरेट करते. कारच्या दोन्ही इंजिनसह, तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.