Donkey pulled the MG Hector, owner took photos; The company's angry on customer
गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढला By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:30 AM2019-12-08T11:30:24+5:302019-12-08T11:38:51+5:30Join usJoin usNext मुळची ब्रिटनची असलेली ही कंपनी चीनच्या SIAC मोटर कार्पोरेशनने विकत घेतलेली आहे. एमजी एका ग्राहकावर कमालीची नाराज झालेली आहे. एका ग्राहकाने एमजी हेक्टर एसयुव्हीचे फोटो एका गाढवासोबत काढून ते सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. यावर कंपनीने ग्राहकाला कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. साधारण 1920 सालची घटना आहे. राजस्थानातील अलवरच्या राजाने रोल्स रॉयस या आलिशान कारला कचरा गाडी बनविले होते. ब्रिटनमध्ये राजा जय सिंग हे रोल्स रॉयसच्या शोरुममध्ये राजेशाही पेहरावात गेले असता त्यांना तेथून घालवून देण्यात आले होते. यानंतर त्यांनी हॉटेलवर परत येत वेटरद्वारे या शोरूमला संपर्क साधला. यावेळी त्यांच्यासाठी शोरुमने रेड कार्पेट अंथरले होते. या रोल्स रॉयसच्या कार ते भारतात घेऊन आले आणि कचरा उचलण्यासाठी त्यांचा वापर सुरू केला. कंपनीला याबाबत समजल्यावर खजील होत राजांची माफी मागण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार भारतात नुकत्याच आलेल्या एमजी मोटर्स या ब्रिटिश कंपनी सोबत घडला आहे. खरेतर राजस्थानमध्ये एका व्यक्तीने मोठ्या हौशेने ही एसयुव्ही घेतली होती. मात्र, कारच्या क्लचमध्ये समस्या निर्माण झाली जी सर्व्हिस सेंटरमध्ये सोडविली गेली नाही. तसेच त्याला अपमानजनक वागणूक देण्यात आली. यानंतर या कार मालकाने हेक्टरला गाढवाला बांधले आणि ओढायला लावले. त्याने एमजीच्या डिलरसमोरच हे कृत्य केले आणि व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. अरुण पवार यांच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ पोस्ट केला गेला. ही घटना 3 डिसेंबरची आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने लक्ष दिले आहे. फेसबुकवर एमजी हेक्टर क्लब इंडियाचे एक सदस्य हेमकांत जैन यांनी कंपनीला याची माहिती दिली. यानंतर कंपनीने हेक्टरच्या मालकाला शोधले तेव्हा त्याचा यामागे स्वार्थ असल्याचे समजले. त्याने कंपनीच्या ‘कस्टमर फर्स्ट’चा गैरमार्गाने लाभ उठविल्याचे लक्षात आले. एमजी इंडियाने सांगितले की गाडीवरील लावलेले आरोपांचे खंडन करत आहे. कार मालकाविरोधात कारवाई केली जाईल कारण त्याने कंपनीची प्रतिमा मलिन केली आहे. टॅग्स :एमजी मोटर्सMG Moters