double toll fine : FASTag can now be recharged through the Bhim app as well
दुप्पट टोल'दंड' वाचणार; FASTag आता भीम अॅपद्वारेही रिचार्ज करता येणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 11:20 AM2019-12-28T11:20:54+5:302019-12-28T11:23:37+5:30Join usJoin usNext फास्टटॅग टोलनाक्यांवर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक अडचणी उद्भवल्याने टोल नाक्यांवर वेळ लागत असल्याने आणि अनेकांचे दोनदा पैसे कापले जात असल्याने ही मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. टोलनाक्यावर गेल्यानंतर अनेकदा फास्टटॅगमध्ये पैसेच टाकलेले नसतात. यामुळे फास्टटॅगच्या लेनमध्ये घुसल्याचा आरोप करत दुप्पट दंड वसूल केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे हे फास्टटॅग वेगवेगळ्या बँकांचे असतात. त्यामुळे ते रिचार्ज करण्यासाठी त्या बँकांच्या वेबसाईवर जाऊनच रिचार्ज करावे लागतात. यामुळे अडचणी येत होत्या. आता आनंदाची बातमी आहे. हे फास्टटॅग आता भीम अॅपद्वारे लगेचच रिचार्ज करता येणार आहेत. त्यामुळे समजा टोलनाक्यावर गेला आणि त्यात आवश्यक रक्कमच नसेल तर लगेचच तुम्ही फास्टटॅग रिचार्ज करू शकणार आहात. एनपीसीआयनुसार हे रिचार्ज कोणत्याही भीम युपीआय अॅपद्वारे करता येणार आहे. भीम अॅपद्वारे फास्टटॅग रिचार्ज कसे करता येईल?टॅग्स :फास्टॅगटोलनाकाFastagtollplaza