Duplicate of Maruti Brezza; But gluey Mahindra XUV300 than it
Maruti Brezza ची डुप्लिकेट; पण तिच्यापेक्षा सरस Mahindra XUV300 By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 09:17 AM2019-02-17T09:17:25+5:302019-02-17T09:22:58+5:30Join usJoin usNext Mahindra XUV300 आपल्या नव्या अवतारात लाँच करण्यात आली आहे. या प्रिमिअम एक्सयुव्हीला महिंद्राने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधन प्रकारात लाँच केले आहे. पेट्रोल व्हेरिअंटची सुरुवात (W4) 7.90 लाख रुपयांपासून सुरु होते. तर डिझेल व्हेरिअंटची सुरुवात 8.49 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. Mahindra XUV300 ची बुकिंग आधीच सुरु झाली होती. मारुती सुझुकीच्या ब्रिझासारखीच ही कार दिसायला जरी असली तरीही या कारमध्ये खूप काही नवे फिचर आहेत. XUV300 ही कार W4, W6, W8 आणि W8(O) या चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. Mahindra XUV300 च्या डिझेल व्हेरिअंटमध्ये कंपनीने 1.5 लीटर टर्बो इंजिन दिले आहे. यामध्ये इंजिन 115 बीएचपीची ताकद आणि 300 Nm टॉर्क उत्पन्न करते. सुरक्षा प्रणाली सर्वोत्तम पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1.2 लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून 110 बीएचपी ताकद आणि 200 Nm चा टॉर्क उत्पन्न करते. सेफ्टी फिचर्सबाबत ही कार मारुतीच्या ब्रेझाला मागे सोडते. XUV300 तब्बल 7 एअरबॅग दिली आहेत. आश्चर्य म्हणजे चालकाच्या गुघ्यालाही एअरबॅगचे संरक्षण आहे. चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. ओआरव्हीएम, हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हील असिस्टसारखे फिचर्सही आहेत. रिअर पार्किंग सेन्सर तर आहेतच पण फ्रंट पार्किंग सेन्सरही देण्यात आले आहेत. एबीएस ईबीडीसह फ्रंट रिअर फॉग लँम्प देण्यात आले आहेत. ड्युअल एसी Mahindra XUV300 मध्ये पहिल्यांदाच दोन प्रकारे एसी सेट करता येणार आहे. हे फिचर एकमेव असे आहे. चालकासाठी वेगळे तापमान आणि शेजारी बसणाऱ्यासाठी वेगळे तापमान एसीमध्ये सेट करता येते. शिवाय 7 इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये जीपीएस नेव्हीगेशन, अँड्रॉईड आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करतो. स्टिअरिंग डिरेक्शन आणखी एक महत्वाचे फिचरम्हणजे स्टिअरिंग डिरेक्शन कोणत्या दिशेला आहे ते कळणार आहे. यामुळे स्टिअरिंग सरळ आहे की वळविलेले हे समजणार आहे. यासाठी कंन्सेल डिस्प्लेवर स्टिअरिंगच्या आकार आणि वळलेली दिशा दिसण्यासाठी अॅरो दाखविण्यात येणार आहे. ही कार भारतीय बाजारात मारुतीची Vitara Brezza, Tata Nexon आणि Ford EcoSport सारख्या कारना टक्कर देणार आहे. टॅग्स :महिंद्राकारMahindracar