EBike Go Rugged: कितीही रगडा! ४० रुपयांत १६० किमीची रेंज; Rugged Electric Scooter ची किंमतही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:14 PM2021-09-30T12:14:03+5:302021-09-30T12:21:16+5:30

EBike Go Rugged will fight Ola E scooter: ओलाच्या ई स्कूटरला फेस आणणार. किंमत निम्म्याने कमी, रेंजही ओला स्कूटरपेक्षा जास्त. सात वर्षांची वॉरंटी...अजून काय हवे

इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेंटल फर्म EBikeGo ने पुढील १२ महिन्यांत संपूर्ण भारतभरात कमीत कमी एक लाखाहून अधिक चार्जिंग पॉईंट उभारण्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये कंपनीने इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT)-इनेबल्ड चार्जर लावण्यास सुरुवात केली आहे.

याचबरोबर येत्या काळात कंपनी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, इंदौर, पुणे आणि अमृतसरमध्ये या प्रकारचे चार्जर लावणार आहे. कंपनी लवकरच येत्या काही महिन्यांत आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. eBikeGo ने नुकतेच Rugged Electric Scooter चे दोन व्हेरिअंट G1 आणि G1+ भारतीय बाजारात उतरविले आहेत.

कंपनीचा दावा आहे की, या इलेक्ट्रीक स्कूटरला चालविण्याचा खर्च खूपच कमी आहे. प्रति किमी केवळ २५ पैसे येणार आहे. म्हणजेच ही स्कूटर एका रुपयात ४ किमी आणि ४० रुपयांत १६० किमी जाऊ शकते. तसेच १०० रुपयांच्या हिशेबाने ही स्कूटर ४०० किमीचे अंतर पार करू शकते.

कंपनीने जी १ इलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 79,999 रुपये ठेवली आहे. तर G1+ व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये ठेवली आहे. दोन्ही स्कूटरच्या किंमतीमध्ये केंद्राची FAME II सबसिडी लागू आहे. परंतू राज्यांची सबसिडी आल्यावर किंमत आणखी कमी होऊ शकते.

Rugged ई-स्कूटर चे अधिकृत वेबसाईटवर बुकिंग सुरु केले आहे. ही स्कूटर ओला सारखीच ४९९ रुपयांत बुक केली जाऊ शकते. बुकिंग रद्द केल्यास पैसे परत मिळणार आहेत. कंपनीने सांगितले की, २१ नोव्हेंबरला या स्कूटरची डिलिव्हरी सुरु केली जाणार आहे.

Rugged इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी रिप्लेस करता येते. ही 4G सोबत IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) सिस्टिमने युक्त आहे. eBikeGo च्या दाव्यानुसार ही बॅटरी दोन तासांत ० ते ८० टक्के चार्ज होते. पूर्ण चार्ज करण्य़ासाठी ४ तासांचा वेळ लागतो.

एकदा चार्ज झाली की ही स्कूटर 160 किलोमीटरचे अंतर कापते. महत्वाचे म्हणजे बॅटरी स्वॅप करता येते. यासाठी एक मिनिट एवढा वेळ लागतो. eBikeGo Rugged स्कूटरमध्ये 3kW मोटर देण्यात आली आहे. याद्वारे ही स्कूटर ७०किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकते.

या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये ३० लीटरचे स्टोरेज स्पेस मिळते. तसेच अँटी थेप्ट फिचर देखील देण्यात आले आहे. मोबाईल अॅपद्वारे दुरूनच लॉक-अनलॉक करता येते. कंपनीने यासाठी अॅप तयार केले असून वेगवेगळ्या १२ सेन्सरना ते नियंत्रित करते.

4G, BLE, CAN बस, GPS/IRNSS, 42 इनपुट/आउटपुट, सीरियल पोर्ट आणि मॉड्यूलर सेंसर सूटसोबत या स्कूटरमध्ये एडवांस्ड 2W IoT सिस्टिम आहे.

अलॉय व्हील, कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिम (CBS) डिस्क ब्रेक्स, १२० किलो वजन आणि बॅटरी पॅक, इलेक्ट्रीक मोटर व चार्जरवर ३ वर्षे किंवा २०००० किमी पर्यंतची वॉरंटी देण्यात येणार आहे. फक्त किमीची वॉरंटी कमी असल्याने ही स्कूटर ग्राहकांना त्रासदायक ठरू शकते. चेसिसवर सात वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.