Electric Vehicle: या वर्षी जगभरात 6 मिलियन इलेक्ट्रिक कार विकल्या जातील, गार्टनरच्या रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 03:51 PM2022-01-30T15:51:33+5:302022-01-30T15:57:04+5:30

गार्टनरच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये जगभरात EV चार्जरची संख्या 2.1 मिलियन युनिट्सपर्यंत वाढेल.

मागील काही वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर दिला जातोय. अनेकजण पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवरुन इलेक्ट्रीक वाहनांच्या दिशेने वळत आहेत. यातच आता 2022 मध्ये जगभरात 6 मिलियन इलेक्ट्रिक कार विकल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मार्केट रिसर्च फर्म गार्टनरच्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये जगभरात EV चार्जरची संख्या 2.1 मिलियन युनिट्सपर्यंत वाढेल. हा आकडा 2021 मध्ये 1.6 मिलीयन होता.

गार्टनरच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये इलेक्ट्रिक कार एकूण ईव्ही शिपमेंटपैकी 95 टक्के प्रतिनिधित्व करतील आणि उर्वरित बस, व्हॅन आणि अवजड ट्रकमध्ये विभागल्या जातील.

2021 मध्ये एकट्या टेस्लाने 1 मिलियन वाहने विकण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण, प्रत्यक्षात 936,172 वाहनांची विक्री झाली. पण, मागील वर्षाच्या तुलनेत 87 टक्के वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये 'COP26' मध्ये, शून्य उत्सर्जन वाहन संक्रमण परिषदेने मान्य केले होते की, ऑटोमेकर्स 2040 पर्यंत फक्त शून्य-उत्सर्जन वाहने विकण्यासाठी वचनबद्ध असतील आणि त्याआधी प्रमुख बाजारपेठांमधील वाहतुकीत डीकार्बोनायझेशनची तयारी करण्यासाठी ऑटोमोटिव्ह क्षेत्रावर दबाव आणतील.

गार्टनरचे संशोधन संचालक जोनाथन डेव्हनपोर्ट म्हणाले की, वाहतूक क्षेत्रातील CO2 उत्सर्जन कमी करण्यात मदत करण्यासाठी ईव्ही हे महत्त्वाचे पॉवरट्रेन तंत्रज्ञान आहे.

सध्या असलेल्या चिप्सच्या कमतरतेचा 2022 मध्ये ईव्ही उत्पादनावर परिणाम होईल. व्हॅन आणि ट्रकची विक्री सध्या कमी आहे, पण हीदेखील येणाऱ्या काळात वेगाने वाढेल.

2030 पर्यंत सर्व विक्रीपैकी 40 टक्के ईव्हीचा वाटा असावा आणि ऑटोमेकर्सनी इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी नवीन कारखाने सुरू करावेत, असा आदेश चीनने ऑटोमेकर्सवर लादला आहे.

2022 मध्ये जागतिक ईव्ही शिपमेंटमध्ये चीनचा वाटा 46 टक्के असेल. वेस्टर्न युरोप 2022 मध्ये 1.9 मिलियन युनिट्स पाठवण्याच्या वेगावर आहे.

तर, 2022 मध्ये 855 हजार इलेक्ट्रिक वाहनांसह शिपमेंटमध्ये उत्तर अमेरिका तिसरा सर्वात मोठा प्रदेश असेल अशी अपेक्षा आहे.