मारुतीच्या मिनी एसयुव्हीची एन्ट्री; जाणून घ्या S-Presso ची किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:49 PM2019-09-30T13:49:53+5:302019-09-30T13:54:22+5:30

भारतातील वाहन क्षेत्र कात टाकत आहे. पॉश, चकचकीत वाहनांची सध्या बाजारात चलती असल्याने जुन्या मॉडेलकडे कोणी फिरकत नाहीय. मारुतीनेही अन्य कंपन्यांच्या स्पर्धेत राहण्यासाठी मिनी एसयुव्ही लाँच केली आहे. S-Presso ही कार आज भारतीय बाजारात उतरवण्यात आली.

Maruti Suzuki S-Presso मध्ये 998 सीसीचे BS VI इंजिन देण्यात आले आहे. याद्वारे 5500Rpm वर 50 किलो वॉटची ताकद आणि 3500Rpm वर 90 Nm टॉर्क उत्पन्ना होणार आहे. यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि एजीएस देण्यात आले आहे.

कारचे मायलेजही चांगले आहे. स्टँडर्ड आणि LXi व्हेरिअंटसाठी प्रति लीटर 21.4 किमीचे मायलेज देण्याच दावा कंपनीने केला आहे. तर VXi MT आणि VXi+ MT व्हेरिअंटला जास्त मायलेज मिळणार आहे. कंपनीने 21.7 किमीचा दावा केला आहे. याचसोबत VXi AGS आणि VXi+ AGS व्हेरिअंटसाठीही 21.7 मायलेज मिळणार आहे.

एस प्रेसोचे रुप मागून काहीसे सुझुकीची छोटी कार इग्निससारखे असून पुढील भाग महिंद्राच्या एक्सयुव्ही 100 सारखा आहे. लांबी 3565 मीमी, रुंदी 1520 मीमी, उंची (Std., LXi) 1549mm (VXi, VXi+) 1564mm, देण्यात आली आहे.

व्हीलबेस 2380mm असून कारमध्ये 5 जण बसू शकतात. कारमध्ये 27 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.

एस प्रेसो सॉलिड सिजल ऑरेंज, पर्ल स्टैरी ब्लू, सुपर व्हाइट, सॉलिड फायर रेड, मेटालिक ग्रेनाईट ग्रे आणि मेटलिक सिल्की सिल्व्हर अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

या कारची सुरुवातीची किंमत 3,69,000 असून वरचे व्हेरिअंट 4.91 लाखांना मिळणार आहेत. एलईडी डीआरएल आणि मोठा ग्राऊंड क्लिअरन्ससह या कारमध्ये 10 हून अधिक सेफ्टी फिचर देण्यात आले आहेत.

डिझाईन फ्युचरएस सारखी आहे. डॅशबोर्डच्यामध्ये डिजिटल स्पीटोमीटर आणि टॅकोमीटर देण्यात आला आहे. तर मध्ये स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्य़ात आली आहे.

ही कार पाहिली वरील दोन कारचा लूक आठवतो.