EV कारची रेंज 490 किमी तर ट्रकची किती असेल? विचारही करू शकत नाही... By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 03:13 PM 2021-09-13T15:13:26+5:30 2021-09-13T15:18:12+5:30
EV Truck Sets Range Record : ऑटोमोटिव्ह कंपनी कॉन्टिनेंटलच्या मदतीने जर्मन डिलिव्हरी कंपनीने हे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. एका बंद टेस्टिंग ट्रॅकवर हा ट्रक चालविण्यात आला. World Record Set By an Electric Truck : जर्मनीच्या एका डिलिव्हरी कंपनी 'DPD' इलेक्ट्रीक ट्रक Futuricum ला एका चार्जिंगमध्ये सर्वाधिक किमी चालविण्याचा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. दोन ड्रायव्हरनी या ट्रकद्वारे 1,099 किमी एवढे मोठे अंतर कापले.
ऑटोमोटिव्ह कंपनी कॉन्टिनेंटलच्या मदतीने जर्मन डिलिव्हरी कंपनीने हे रेकॉर्ड आपल्या नावे केले आहे. एका बंद टेस्टिंग ट्रॅकवर हा ट्रक चालविण्यात आला.
एकदा चार्ज केलेली बॅटरी संपवण्यासाठी त्यांना 1,099 किलोमीटर अंतर कापावे लागले. यासाठी 23 तास लागले. यासाठी दोन चालकांनी 4.5 तासांच्या अंतराने शिफ्ट बदलत हे अंतर पार केले. यासाठी सरासरी वेग हा 50 किमी होता.
हा ट्रक बनविणारी कंपनी ही स्वित्झर्लंडची आहे. तिचे नाव फ्युचुरिकम आहे. ही कंपनी व्होल्वोच्या ट्रक चेसिससह ईव्ही चार्जर आणि बॅटरी पॅक बनविण्यात तरबेज आहे. ही कंपनी हे ईव्ही ट्रक विकसित करते.
आपल्या अधिकृत वेबसाईटवर कंपनीने सांगितले की, हा ट्रक सिंगल चार्जमध्ये 760 किमीचे अंतर कापतो. मात्र, हाच दावात्यांच्याच बनविलेल्या फ्युचुरिकम लॉजिस्टिक ट्रक 18E ने खोटा ठरविला आहे. त्याने 340 किमी म्हणजे नेक्सॉनच्या रेंजपेक्षाही जास्तीचे अंतर कापले आहे.
काय काय करामती केल्या... ही टेस्ट फक्त प्रशिक्षित ड्रायव्हर करू शकत होते. या चालकांनी ट्रकच्या रेंजचा जास्तीत जास्त फायदा उठविला आणि 1100 किमीच्या आसपास ट्रक चालविला.
कंपनीने यासाठी खास टायर लावले होते. तसेच ट्रक पूर्णपणे रिकामा होता. तरीही या ट्रकचे वजन 15.5 टन होते. याचा अधिकतर पेलोड 6.6 टन आहे. या ट्रकने ट्रॅकच्या 392 फेऱ्या मारल्या.
ही टेस्ट घेत असताना बाहेर वेगाने वारे सुरु होते. बाहेरील तापमानही 14 डिग्री सेल्सिअस होते. हा ट्रक मे महिन्यात वापरात आणण्यात आला होता. आता पर्यंत ट्रकने 12033 किमीचे अंतर कापलेले आहे. मालासह रस्त्यावर या ट्रकची ड्रायव्हिंग रेंज ही 541 किमी आहे.