हवेत उडणारी जगातली पहिली कार, एकदा उड्डाण केल्यानंतर जाणार 640 किलोमीटर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:43 PM2018-10-01T15:43:03+5:302018-10-01T15:48:38+5:30

विमानातून अवकाश पाहणं यात काही नवं नाही. परंतु आता तुम्हाला उडत्या कारमधून अवकाश प्रवास करणं शक्य होणार आहे.

कारण आता आकाशात उडणारी कार अमेरिकेतल्या टेराफुगिया कंपनीनं तयार केली आहे.

या कारसाठी ऑक्टोबरपासून प्री-बुकिंग सुरू झालं आहे. टेराफुगिया ट्रान्झिशन ही कंपनी हवेत उडणारी कार घेऊन बाजारात आली आहे.

या कारची हवेतील गती 160 किलोमीटर प्रतितास आहे. टेराफुगिया ट्रान्झिशननं या कारनं एकदा उड्डाण केल्यानंतर कार 640 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

विशेष म्हणजे या कारला आकाशासह रस्त्यावरही तुम्ही पळवू शकता.