पेट्रोलचा दर काही कमी होणार नाही, पण 'या' ५ टिप्स तुमच्या कारचं मायलेज नक्की वाढवतील! वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 02:58 PM 2022-08-01T14:58:31+5:30 2022-08-01T15:27:38+5:30
देशभरात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. आता पेट्रोलच्या किमती १०० रुपयांच्या खाली येतील याची शक्यता फारच कमी आहे. परंतु तुमच्या खिशावरचा वाढता भार कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्सवर काम करू शकता. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत. देशात अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलीटर १०० रुपयांपेक्षा अधिक किमतीला मिळत आहे. काही ठिकाणी तर प्रतिलीटर १२० रुपये दर आहे. पेट्रोलच दर येत्या काळात काही १०० रुपयांच्या खाली येतील याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर खाली येण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या कारचं मायलेज कसं वाढवता येईल हे फार महत्वाचं झालं आहे. कारचं मायलेज वाढविण्यासाठीच्या काही टिप्स आपण जाणून घेऊयात...
कारच्या टायर्समध्ये पूर्ण हवा भरली असेल याची काळजी घ्या कारच्या मायलेजचे कनेक्शन कारच्या टायरमधील हवेवर देखील अवलंबून असते. निर्धारित मानकापेक्षा टायर्समध्ये कमी हवा असल्यास, रोलिंग असिस्टेंस जास्त होते. याचा अर्थ असा की तुमचे वाहन प्रति किमी जितके जास्त अंतर कापेल तितके घर्षण आणि रोलिंग प्रतिरोध निर्माण होईल. याचा थेट परिणाम तुमच्या वाहनाच्या इंधनाच्या वापरावर होतो. Mobil.com च्या मते, जर तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये 10 पॉइंट कमी हवा असेल तर त्याच्या मायलेजवर थेट 10% परिणाम होतो.
बूट स्पेसमध्ये कमी सामान ठेवा काही लोकांना अशी सवय असते की प्रवासादरम्यान ते बूट स्पेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक सामान ठेवतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्या कारच्या बूट स्पेसमध्ये जितके जास्त सामान असेल तितका त्याचा तुमच्या कारच्या मायलेजवर परिणाम होईल. तुमच्या कारमध्ये ५० किलो अतिरिक्त सामान असल्यास, तुमच्या मायलेजवर २% परिणाम होतो.
खूप वेगाने किंवा खूप हळूही कार चालवू नका जास्त मायलेज मिळवण्याचा नियम म्हणजे गाडी खूप वेगाने चालवू नये आणि खूप हळू देखील चालवू नये. तुम्ही जितक्या वेगाने कार चालवाल तितकी तुमची कार अधिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी इंधनाचा वापर करेल. गाडी हळू चालवत असतानाही जास्त इंधन लागते. त्यामुळे सरासरी वेगात जास्त काळ वाहन चालवण्याचा प्रयत्न करणे उत्तम ठरते.
ठराविक वेग कायम राखा कारच्या वेगात सतत चढ-उतार झाल्यामुळे इंजिनवर दबाव येतो, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. जर तुम्ही एकाच वेगाने कार चालवत असाल तर इंजिनची कार्यक्षमता अधिक चांगली असल्याचे सिद्ध होते. तुमच्या कारचा एक्सलेटर उच्च रिझोल्यूशन प्रति मिनिट चालवणं टाळा. कार कमी RPM वर चांगलं मायलेज देते.
ब्रेकचा जास्त वापर होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही ब्रेक कसे लावता यावर कारचे मायलेज अवलंबून असते. रॅश ड्रायव्हिंग करताना तुम्ही सतत ब्रेक लावल्यास, कारला पुन्हा वेग वाढवणे आवश्यक आहे, या प्रक्रियेत जास्त इंधन वापरले जाते. जर तुम्ही ब्रेक न लावता गाडी एका वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा इंजिनला गती देण्याची गरज भासणार नाही आणि इंजिन अधिक चांगली कामगिरी करेल.