ऑफ रोडिंगचा थरार: लॉन्च होणार Force ची 5-Door Gurkha; टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 04:12 PM 2023-12-18T16:12:34+5:30 2023-12-18T16:16:18+5:30
Force Gurkha: मारुती Jimny आणि महिंद्रा Thar ला टक्कर देण्यासाठी येत आहे फोर्स Gurkha. Force Gurkha 5-Door: फोर्स कंपनीची गुरखा (Force Gurkha), मारुती जिमनी (Jimny) किंवा महिंद्रा थार (Thar) प्रमाणे लोकप्रिय नाही, पण ऑफ रोडर मार्केटमध्ये गुरखाची नेहमी चर्चा होत असते. Force ची Gurkha एक पॉवरफुल ऑफ रोडर SUV आहे. आता कंपनी याचे अपडेटेड व्हर्जन आणणार आहे. Jimny प्रमाणे फोर्सदेखील Gurkha चे 5-डोअर व्हर्जन आणत आहे. अनेकदा टेस्टिंगदरम्यान ही स्पॉट झाली आहे.
अलीकडे गुरखा 5-डोअर ऑफ रोडर चाचणीदरम्यान स्पॉट झाली. याच्या टेस्ट म्यूलमध्ये उत्सर्जन परीक्षण किट लावली होती. म्हणजेच, या SUV ची दिल्लीत टेस्टिंग सुरू आहे. फोटो पाहून असे दिसून येते की, कंपनीने 5-डोअर गुरखाला याच्याच 3-डोअर व्हर्जनप्रमाणे बॉक्सी डिझाइन दिले आहे.
सध्या मार्केटमध्ये असलेली Gurkka 4116 मिमी लांब आहे, पण आगामी 5-डोअर व्हर्जन ज्यास्त लांब असू शकते. बाकी या गाडीचे हेडलँप, सेंटरमध्ये फोर्सचा लोगो, फ्रंट ग्रिल आणि टेललाइट्स सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहतील, अशी अपेक्षा आहे.
प्रोटोटाइप में 5-स्पोक मशीन-कट अलॉय व्हील्स देखे गए हैं. साथ ही, इसमें दोनों तरफ अलग-अलग तरह की टेललाइट्स दिखीं, जो प्रोडक्शन मॉडल में ऐसी नहीं होंगी. इसमें स्नोर्कल भी था. हालांकि, इसकी रूफ से सामान रखने की रैक गायब थी. टेलगेट में पारंपरिक स्पेयर व्हील लगा हुआ था.
याच्या प्रोटोटाइपमध्ये 5-स्पोक मशीन कट अलॉय व्हील्स दिसत आहेत. तसेच, यात दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे टेललाइट्स दिसत आहेत, जे प्रोडक्शन मॉडेलमध्ये नसतील. त्यात स्नॉर्कलही आहे. मात्र, त्याच्या टॉवर सामान ठेवण्याचे रॅक गायब आहे. पाठीमागून पारंपारिक स्पेअर व्हील दिसत आहे. एकंदरीत ही नवीन एसयूव्ही बऱ्याच प्रमाणात पूर्वीप्रमाणेच असेल.
इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, 5-दोअर गुरखा त्याच्या 3-डोअरप्रमाणेच 2.6-लिटर CRDI डिझेल इंजिनसह येण्याची अपेक्षा आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले जाऊ शकते. हे इंजिन 90 bhp आणि 250 Nm आउटपुट देते. यात सध्याच्या गुरखाप्रमाणे 4×4 ड्राइव्हट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे.