वाहतूक कोंडीपासून होणार सुटका; पुढील 3 वर्षात येणार हवेत उडणारी कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:13 PM2020-01-08T20:13:16+5:302020-01-08T20:17:00+5:30

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. इच्छित ठिकाणावर पोहचण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते. याच लोकांसाठी ह्युंदाईने उडणारी कार उबेर कंपनीच्या भागीदारीत आणण्याचा विचार करत आहे. २०२३ पर्यंत या फ्लाईंग कारची सुविधा सुरु करण्याचा मानस आहे.

कन्ज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स कार्यक्रमात ह्युंदाईने S A-1 नावाची फ्लाईंग कारची योजना आणली होती. या उडणाऱ्या वाहनात ४ प्रवाशी बसू शकतात.

ह्युंदाईच्या या फ्लाईंग कारमध्ये वर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग करण्याची क्षमता आहे. जमिनीपासून १ ते २ हजार फूटांवर या क्रूजिंगचा स्पीड २९० किमी प्रति तास असेल.

सुरुवातीला या फ्लाईंग कारमध्ये पायलट असेल असं सागितलं होतं मात्र आता ऑटेमॅटिक सिस्टिमने ही कार बनविण्यात आली आहे. त्यामुळे पायलटची गरज भासणार नाही असं ह्युंदाईने सांगितलं आहे.

एस ए १ फ्लाइंग टॅक्सीत १०० किमी प्रवास करण्यासाठी सक्षम बनवण्यात आली आहे.

ही फ्लाईंग कार एका मोठ्या हेलिकॉप्टरच्या आवाजाच्या तुलनेत कमी आवाज करेल तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही कार बनविण्यात आली आहे.

मेलबर्न, लॉस एंजेलिस, डलास या शहरात पहिल्यांदा ही सुविधा देण्यात येईल. २०२० मध्ये या टॅक्सीचा ट्रायल घेण्यात येईल त्यानंतर २०२३ पर्यंत त्याचा व्यावसायिक वापरासाठी करण्यात येईल.