Fuel Saving Tips: पेट्रोल, डिझेल परवडत नाहीय, मग मायलेज कसे वाढवणार?; काही टिप्स... By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 05:20 PM 2021-04-05T17:20:22+5:30 2021-04-05T17:32:56+5:30
How to save money on Petrol, Diesel: सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे लोकांचे उत्पन्न बुडाले आहे. अशातच पेट्रोलच काय तर डिझेली कारही परवडेनाशी झाली आहे. शंभरीकडे झेपावलेल्या पेट्रोल डिझेलची किंमत दोन वेळा कमी होऊन पुन्हा स्थिर झाली आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे लोकांचे उत्पन्न बुडाले आहे. अशातच पेट्रोलच काय तर डिझेली कारही परवडेनाशी झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीएत. यामुळे आपणच इंधन वाचविणे फायद्य़ाचे ठरणार आहे. यासाठी काही टिप्स आहेत, जरूर वाचा.... (How to increase average of car, bike? follow these tips...)
वाहनाच्या वेगावर लक्ष ठेवा... गाडीचे मायलेज सुधारण्यासाठी वाहनाला एकाच वेगात चालविणे खूप महत्वाचे असते. वेग अचानक वाढविणे आणि अचानक ब्रेक दाबल्याने इंधन जास्त वापरले जाते. गाडीचा वेग स्थिर ठेवल्याने मायलेज वाढू शकते. तसेच वेगावर लक्ष ठेवल्याने चालकाला सारखा गिअर बदलण्याची आवश्यकता लागणार नाही.
गिअर बदलण्याचा टायमिंग... मॅन्युअल ट्रान्समिशनच्या गाड्य़ांमध्ये ठराविक वेगावर गिअर बदलणे गरजेचे असते. आजकाल अनेका कारमध्ये गिअर शिफ्ट इंडिकेटर आकड्यांमध्ये दिला जातो. जुन्या वाहनांमध्ये ही सोय नाही. यामुळे वेगानुसार गिअर कमी-जास्त करणे गरजेचे आहे.
सिग्नल लागल्यास... सिग्नल लागल्यास आणि तो जास्त कालावधीचा असल्यास अनेकजण त्यांचे वाहन बंद करत नाहीत. 30 सेकंदांपेक्षा जास्तीचा सिग्नल लागला तर गाडी बंद करणे फायद्याचे आहे. अनेक सिग्नलवर मिळून एक तासापेक्षा जास्त वेळ गाडी सुरु ठेवल्यास जवळपास 150-200 रुपयांचे इंधन जळते, असे एका पाहणीत समोर आले आहे.
टायर प्रेशर... कोणतेही वाहन चालविताना वेळोवेळी टायरचे प्रेशर चेक करणे गरजेचे आहे. तुमच्या वाहनाच्या कंपनीने टायरमध्ये हवा किती असावी हे दिलेले असते. त्यानुसार ही हवा भरावी. कमीतकमी आठवड्यातून एकदा हवा तपासावी. कमी हवा असल्यास वाहन पुढे नेण्यासाठी इंजिनाला जास्त ताकद लावावी लागते.
एसी गरज असेल तर.... अनेकदा गरज नसताना एसी चालू ठेवला जातो. यामुळे वेगाने इंधन खर्ची पडते. जर वातावरण उष्ण नसेल तर एसी टाळला पाहिजे.
ट्रॅफिकचा अंदाज... जरी तुम्ही नेहमी एकाच रस्त्यावरून ये-जा करत असाल तरी देखील निघण्यापूर्वी आणि सिग्नलवर वेळ मिळेल तेव्हा ट्रॅफिक दाखविणाऱ्या अॅपचा वापर करावा. यामुळे वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी कमी कोंडी असलेल्या रस्त्यावरून लवकर जाता येईल आणि इंधनही वाचेल.
वेळेवर मेन्टेनन्स तुमच्या वाहनाचा वेळेवर मेन्टेनन्स करणे गरजेचे आहे. इंजिन, क्लच, गिअर आदी भागांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. यासाठी वेळेवर मेन्टेनन्स करावा.
चांगले इंधन.... जर तुम्ही वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर इंधन भरत असाल तर तसे करू नका. एखादा चांगला पेट्रोल पंप निवडा, लोकांना विचारा आणि मगच इंधन भरा. इंधनामध्ये भेसळ, टाकीची सफाई आदी करतात का ते पहावे. तसेच रात्री किंवा सकाळी इंधन भरावे. तापलेले नसल्याने डेन्सिटी कमी जास्त होते.
फ्युअल अॅडिटीव्हज... फ्युअल अॅडिटीव्हज फक्त वाहनाची इफिसिअन्शी नाही तर गाडीचा टॉप स्पीड आणि परफॉरर्मन्सदेखील वाढवितात. फ्युअल इंजेक्टरवर कार्बन जमा होतो. इंधानातील अशुद्धीमुळे गंजही लागण्याची शक्यता असते. इंजिन व्हायब्रेट करायला लागते. यामुळे तुमच्या विश्वासू मेकॅनिकला विचारून Fuel Additives वापरावे.