GAC Aion V: खतरनाक EV! केवळ 8 मिनिटांत चार्ज; रेंज एवढी की TATA Nexon चारदा थांबवावी लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 04:41 PM 2021-08-01T16:41:51+5:30 2021-08-01T17:04:16+5:30
GAC Aion V Has A Battery That Can Achieve 80% Charge In 8 Mins; 1000 km Range अनेकांना ईलेक्ट्रीक कार घ्यायची आहे. परंतू बजेट तेवढे नसल्याने किंवा रेंज, चार्जिंगची सोय तेवढी नसल्याने हे ग्राहकदेखील कार बाजाराकडे पाठ फिरवत आहेत. परंतू आता असे एक तंत्रज्ञान आले आहे, ज्याद्वारे कार केवळ 8 मिनिटांत चार्ज होणार आहे. तसेच या कारला 1000 किमीची रेंज आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे वाहन बाजाराचे कंबरडेच मोडले आहे. ग्राहकांना परवडत नसल्याने आणि बाजारात ईलेक्ट्रीक किंवा सीएनजी कारचे तेवढे पर्याय उपलब्ध नसल्याने नव्या कार घेण्यास माघार घेतली आहे.
अनेकांना ईलेक्ट्रीक कार घ्यायची आहे. परंतू बजेट तेवढे नसल्याने किंवा रेंज, चार्जिंगची सोय तेवढी नसल्याने हे ग्राहकदेखील कार बाजाराकडे पाठ फिरवत आहेत. परंतू आता असे एक तंत्रज्ञान आले आहे, ज्याद्वारे कार केवळ 8 मिनिटांत चार्ज होणार आहे. तसेच या कारला 1000 किमीची रेंज आहे. (Charging EV quicker than filling petrol? Chinese car maker's claim invites doubt)
भारतात टाटाने इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला गती दिली आहे. सध्या टाटाच्या ताफ्यात दोन ईव्ही कार आहेत. यापैकी नेक्सॉन ईव्ही ही 310 किमी रेंज देते. तर ह्युंदाईकडे एक कार आहे. जी 450 किमीची रेंज देते.
भारतातील वाढते मार्केट पाहून टाटासह Hyundai, Mahindra, Mercedes, Audi आणि Jaguar सारख्या कंपन्यांनी आपल्या ईव्ही कार लाँच केल्या आहेत. आता या कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी चीनची कंपनी तयार झाली आहे.
सामान्यपणे एखादी ईव्ही कार चार्ज करण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. फास्ट चार्जर असेल तर दीड दोन तास. आता यावर कडी म्हणून एका कार कंपनीने अशी बॅटरी विकसित केली आहे जी केवळ 10 मिनिटांतच बॅटरी चार्ज करणार आहे.
चीनची वाहन निर्माता कंपनी Guangzhou Automobile Corporation (GAC), ग्वांगझू ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन (जीएसी) ने नुकतीच नवीन इलेक्ट्रीक कार Aion V बाजारात आणली आहे. या कारमध्ये ग्रॅफीन बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
यामुळे या कारची बॅटरी 8 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. जीएसीच्या दाव्यानुसार 3सी आणि 6सी व्हर्जन टेक्नॉलॉजी बॅटरीला वेगाने चार्ज करण्य़ास सक्षम आहे. 3 सी फास्ट चार्जरद्वारे कारची बॅटरी 16 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज आणि 10 मिनिटांत 30 ते 80 टक्के बॅटरी चार्ज करते.
महत्वाचे म्हणजे इंधन भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्या वेळात ही बॅटरी 80 टक्के चार्ज होणार आहे. हे तंत्रज्ञान जर सार्वजनिक झाले तर ईलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात मोठी क्रांती ठरणार आहे.
1000 किमीची रेंज कंपनीचा दावा आहे की, GAC Aion V इलेक्ट्रीक कार फुल चार्ज झाली की 1000 किमी एवढे मोठे अंतर कापू शकते. मात्र, कंपनीच्या या ग्राफीन बॅटरी टेक्नॉलॉजीचे पुढील काही वर्षे तरी व्यावसायिकरण होणे कठीण आहे.
तरीही या क्रांतीकारी तंत्रज्ञानामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या कारना नवा चांगला पर्याय मिळेल हे संकेत आहेत. येत्या काही वर्षांत 1000 किमी ड्रायव्हिंग रेजच्या कार रस्त्यांवर धावताना दिसतील.
दावा वादात GAC Aion V कंपनीने बॅटरी एवढ्या फास्ट चार्ज होत असल्याचा दावा केलेला असला तरी देखील अनेकांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. बॅटरी जेवढ्या फास्ट चार्ज होईल तेवढ्या लवकर तिचे आयुष्य संपेल.
कंपनीने यावर आपण ही कार लाखावर किमी चालविली आहे. याकाळात बॅटरी खराब झाली नाही. त्यामुळे ग्राहकांनी लाख किमी चालविली तरी बॅटरी खराब होणार नसल्याचे सांगितले आहे.