german ambassador fall in love with indian ambassador car
जर्मनीच्या राजदुतांनी 'देशी' ऑडी, बीएमडब्ल्यूला झिडकारले; 'या' भारताच्या कारला स्वीकारले By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 08:37 PM2019-06-13T20:37:27+5:302019-06-13T20:43:46+5:30Join usJoin usNext ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, पोर्श सारख्या आलिशान वाहन कंपन्यांना जन्म देणाऱ्या जर्मनीचे राजदूत भारतातील एका कंपनीच्या कारवर फिदा आहेत. यामुळे ते परदेशातील भारतीयांमध्येही लोकप्रिय झाले आहेत. वाल्टर जे लिंडनर हे जर्मनीचे भारतातील राजदूत आहेत. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. एकेकाळी राजकीय हस्तींची आणि भारतीय रस्त्यांवर राज्य करणारी अॅम्बॅसिडर कार लिंडनर यांना कमालीची आवडलेली आहे. लिंडनर हे अशा देशाचे राजदूत आहेत, ज्या देशाने जगभरामध्ये वाहन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. लिंडनरच नाहीत तर अनेक देशांचे प्रतिनिधी हिंदुस्तान अॅम्बॅसिडरसोबत फोटो काढतात. या कारसोबत फियाटची पद्मिनी ही कारही परदेशी वाहन तज्ज्ञ चालविण्यास उत्सुक असतात. तसेच लिंडनर यांची लाल रंगाची कार दिल्लीमध्ये कमालीची प्रसिद्ध आहे. लिंडनर त्यांचे कारसोबतचे फोटो नेहमी सोशल मिडीयावर पाठवत असतात. हिन्दुस्तान मोटर्सनेही कधी लाल रंगाची अॅम्बॅसिडर बाजारात आणली नसेल. मात्र, लिंडनरनी त्यांच्या कारला लाल रंगामध्ये रंगविले आहे. लिंडनर नुकतेच राष्ट्रपती भवनात गेले होते. यावेळीही त्यांनी या लाल रंगाच्या अॅम्बॅसिडरमधून प्रवास केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीलाही ते याच कारने गेले होते. लिंडनर जेव्हा 21 वर्षांचे होते तेव्हा 1977 मध्ये वाराणसीला आले होते. त्यांना श्रीनगर, जयपूर, डेहराडून आणि ऋषिकेश ही शहरे आवडतात. खरेतर परदेशांचे अधिकारी भारतात येताना महागड्या गाड्या सोबत घेऊन येतात. त्यांना भारत सरकार आयात शुल्क लावत नाही. अॅम्बॅसिडर कार 1957 मध्ये भारतात आली होती. 2014 मध्ये या कारचे उत्पादन बंद झाले. या कारमध्ये 1.9 आणि 2 लीटरचे इंजिन होते. टॅग्स :जर्मनीनरेंद्र मोदीGermanyNarendra Modi