Electric Scooter: बिना चार्जिंगच्या धावतात या इलेक्ट्रीक स्कूटर; लांबच्या प्रवासात फक्त 5 मिनिटेच थांबावे लागते By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 05:19 PM 2021-05-27T17:19:39+5:30 2021-05-27T17:25:54+5:30
Electric Scooter battery swapping feature: इलेक्ट्रीक स्कुटरची रेंज जास्त नाहीय. 70 ते 110 किमीच्या रेंजमध्ये या स्कूटर धावू शकतात. परंतू वाहतूक कोडीं, चढउतार पाहता प्रत्यक्षात दावा केलेली रेंजदेखील मिळत नाही. यामुळे बेभरवशाचे असे हे वाहन वाटत आहे. यामुळे हे फिचर एकदम रेंज दुप्पट, तिप्पट करणार आहे. भारतात इलेक्ट्रीक वाहनांची (Electric scooter in India) बाजारपेठ हळूहळू जोर धरू लागली आहे. मात्र, तरीही लोक इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची बॅटरी, रेंज आणि चार्जिंगची समस्या. (Electric scooter Battery swaping feature is good for long travelers.)
इलेक्ट्रीक स्कुटरची रेंज जास्त नाहीय. 70 ते 110 किमीच्या रेंजमध्ये या स्कूटर धावू शकतात. परंतू वाहतूक कोडीं, चढउतार पाहता प्रत्यक्षात दावा केलेली रेंजदेखील मिळत नाही. यामुळे बेभरवशाचे असे हे वाहन वाटत आहे.
जर तुम्ही एखाद्या प्रवासाला निघाला आणि ही स्कूटर बंद पडली तर काय करायचे? त्यापेक्षा पेट्रोलवर चालणारी स्कूटर काय वाईट असा समज लोकांचा झालेला आहे आणि तो बऱ्याच अंशी खरादेखील आहे.
म्हणूनच काही कंपन्यांनी अशा स्कूटर बाजारात आणल्या आहेत, ज्या चार्ज करण्याची झंझटच नाही.
ईलेक्ट्रीक स्कूटरची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तासांचा वेळ खाते. लोकांकडे तेवढा वेळही नाही.
काही कंपन्यांनी बॅटरी संपली की ती बदलण्याची म्हणजेच स्वॅपिंग सपोर्ट असलेल्या स्कूटर लाँच केल्या आहेत. याच्या मदतीने तुम्ही स्कूटरची रेंज दुप्पट, तिप्पट वाढवू शकता. कोणत्या आहेत या स्कूटर....
अशा बॅटरी मिळण्याची सेंटर आता या कंपन्या सुरु करणार आहेत. केंद्र सरकारही चार्जिंग स्टेशनबरोबर अशा प्रकारची सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. तुमची संपलेली बॅटरी द्यायची आणि दुसरी बॅटरी त्या बदल्यात चार्जिंगचे पैसे देऊन घ्यायची अशी ही सिस्टिम असणार आहे.
Gogoro Viva Electric Scooter Gogoro Viva electric scooter ही डिटॅचेबल बॅटरीसोबत येते, याच्या मदतीने स्कूटरची रेंज वाढविता येते. एकदा चार्ज केली की 85 किमीची रेंज आहे. तसेच ही स्कूटर ताशी 30 किमी वेगाने धावू शकते.
एकदा बॅटरी संपली की ती नोंदणीकृत दुकानदार, डीलरकडून बदलता येते. यासाठी काही रुपये भाडे आकारले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर काही दिवसांपूर्वीच भारतात रजिस्टर करण्यात आली आहे.
Ola Electric Scooter Ola Electric Scooter मध्ये देखील Viva Electric Scooter सारखीच काढता येणार बॅटरी आहे. यामुळे ती डिस्चार्ज झाली की दुसरी बदलून दुप्पट म्हणजेच 480 किमीची रेंज मिळवू शकता. सिंगल चार्जला ही स्कूटर 240 किमी रेंज देते. बॅटरी स्वॅपिंगसाठी तुम्हाला 5 मिनिटे लागणार आहेत.