कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! TATA करणार मोठा धमाका, सफारीपासून अल्ट्रोझपर्यंत येणार इलेट्रिक कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 02:43 PM2023-01-10T14:43:15+5:302023-01-10T14:47:46+5:30

टाटा मोटर्स देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी. ग्राहकांसाठी टाटा नवे मॉडेल्स बाजारात लाँच करत असते.

टाटा मोटर्स देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी. ग्राहकांसाठी टाटा नवे मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. गेल्या दोन वर्षापासून टाटाने अनेक नवे मॉडेल्स बाजारात आणले. आता टाटा इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणार आहे. यात Nexon EV, Tiago EV सारखे मॉडेल्स लाँच करणार आहे. आता कंपनीने नव्या इलेक्ट्रिक कारचा टीझर लाँच केला आहे. हा टीझर २०२३ मध्ये Auto Expo मध्ये दाखवण्यात येणार आहे.

सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर्षीच्या Auto Expo मध्ये इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात असणार आहेत. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोटर्समध्ये पाऊल ठेवले आहे. आता टाटा कंपनीही Expo मध्ये आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना ठेवणार आहे.

टाटा इलेक्ट्रिक व्हेइकल जिव्हीजनने या संदर्भात सोशल मीडियावर टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये टाटाची सफारी, हेरियर, अल्ट्राझ सारखे मॉडेल इलेक्ट्रिकमध्ये लाँच करणार आहे.

टाटा मोटर्स ऑटो एक्सपोमध्ये त्यांचे दोन संकल्पना मॉडेल्स Curvv आणि Avinya देखील दाखवले जाणार आहेत. नवीन टीझरनुसार, कंपनी सफारी, हॅरियर आणि प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्राचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करेल. त्यांच्या इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये टाटा मोटर्सचे खास Ziptron तंत्रज्ञान पाहता येईल, जे Nexon, Tiago आणि Tigor Electric मध्ये वापरले जाते.

Altroz ​​हॅचबॅकची इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनीने 2019 मध्ये जिनिव्हा मोटर शो दरम्यान सादर केली होती. त्याचे उत्पादन-तयार मॉडेल लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा होती, पण कोरोना महामारीमुळे ही योजना काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

कंपनी तिच्या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये तीन-फेज PMSM इलेक्ट्रिक मोटर वापरेल, जी 30.2 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल. त्याची इलेक्ट्रिक मोटर 129 PS पॉवर आणि 245 Nm टॉर्क जनरेट करते. Altroz ​​EV एका चार्जवर 312 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज ऑफर करेल आणि त्याची बॅटरी सामान्य 15 amp घरगुती सॉकेटसह 8 ते 9 तासांमध्ये चार्ज केली जाऊ शकते. टाटा मोटर्सने या कार संदर्भात माहिती दिलेली नाही.

या दोन्ही वाहनांचे नुकतेच अनावरण करण्यात आले, कर्व्ह ब्रँडच्या दुसऱ्या पिढीच्या EV आर्किटेक्चरवर आधारित कूप आहे. तर अवन्या तिसऱ्या पिढीच्या ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित आहे. तिसर्‍या जनरेशनमध्ये प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणालीसह एक सुधारित बॅटरी पॅक समाविष्ट केला जाईल, जो कारला फक्त 30 मिनिटांत इतकी शक्ती देईल की ती 500 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.

Tata Safari आणि Harrier EV: टाटा सफारी आणि हॅरियर दोन्ही कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्‍या मॉडेल्सपैकी आहेत. कंपनी यामध्ये मोठा बॅटरी पॅक वापरू शकते अशी अपेक्षा आहे. हे शक्य आहे की कंपनी त्यात 60 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक समाविष्ट करेल. या दोन्ही एसयूव्ही सुमारे 400 ते 450 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसह लॉन्च केल्या जाऊ शकतात. या SUV बद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.