CNG कार चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:54 PM2022-08-23T20:54:57+5:302022-08-23T20:58:08+5:30

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने CNG आणि LPG किटबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

सीएनजी कार चालकांसाठी एक आनंदची बातमी आहे. सीएनजीबाबत सरकारने एक मोठी घोषणा केलीये. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पेट्रोल/डिझेल BS6 कारमध्ये CNG सोबत LPG किटच्या रेट्रो-फिटमेंटला परवानगी दिली आहे. यापूर्वी, सीएनजी किंवा एलपीजी किटच्या रेट्रो-फिटमेंटला फक्त बीएस 4 वाहनांमध्ये बसवण्याची परवानगी होती.

परिवहन मंत्रालयाने असेही सूचित केले की, 3.5 टनपेक्षा कमी वजनाच्या BS6 वाहनांच्या बाबतीत डिझेल इंजिनऐवजी CNG/LPG इंजिन बसवता येईल. मंत्रालयाने BS 6 पेट्रोल वाहनांवर CNG आणि LPG किटचे रेट्रो-फिटमेंट आणि 3.5 टन पेक्षा कमी असलेल्या BS6 वाहनांच्या बाबतीत CNG/LPG इंजिनसह डिझेल इंजिनमध्ये बदल करण्याची परवानगी असेल.

पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी देशात सीएनजी कारच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीएनजी वाहने पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देतात. पण, सीएनजी वाहनांच्या तुलनेत कंपनी-फिट केलेल्या सीएनजी वाहनांमध्ये अधिक पर्यायांचा अभाव आणि सीएनजी वाहनांच्या तुलनेत कमी सीएनजी फिलिंग स्टेशन ही एक समस्या आहे.

सीएनजी हा पर्यावरणासाठी चांगला पर्याय आहे आणि कारमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत करू शकतो. मंत्रालयाने म्हटले की, पेट्रोल आणि डिझेल कार सीएनजी कारच्या तुलनेत कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन्स, कण आणि धूर जास्त प्रमाणात सोडतात.

भारत स्टेज हे बीएस (भारत स्टेज उत्सर्जन मानक) चे पूर्ण रूप आहे, जे वाहनांमधील प्रदूषण मोजण्यासाठीचे एक मानक आहे. वाहनांच्या इंजिनमधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या प्रदूषकांचे मोजमाप करण्याची ही पद्धत आहे. भारत स्टेज हे बीएस (भारत स्टेज उत्सर्जन मानक) चे पूर्ण रूप आहे, जे वाहनांमधील प्रदूषण मोजण्यासाठी एक मानक आहे.

वाहनांच्या इंजिनमधून कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या प्रदूषकांचे मोजमाप करण्याची ही पद्धत आहे. भारतात 1 एप्रिल 2020 पासून फक्त BS-6 मानक वाहने बाजारात येत आहेत, परंतु जी BS-4 वाहने आधीपासून सुरू असू, ती बंद केलेली नाहीत.

टॅग्स :वाहनAutomobile