THAR प्रेमींसाठी आनंदाची बातमी: १५ ऑगस्टला येणार ५ दरवाजे असणारी 'THAR ROXX', पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 05:31 PM2024-07-20T17:31:18+5:302024-07-20T17:39:14+5:30

Thar 5 Door व्हर्जनची थारचे शौकिन असलेले चालक मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत.

देशातील प्रमुख स्पोर्ट युटिलिटी व्हिकल (SUV) निर्माण करणारी कंपनी असलेली महिंद्रा अँड महिंद्रा लोकप्रिय ठरलेल्या थार गाडीचे ५-डोअर व्हर्जन लवकरच लाँच करणार आहे.

Thar 5 Door व्हर्जनची थारचे शौकिन असलेले चालक मागील अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडून थारच्या नव्या व्हर्जनचा व्हिडिओ टीझर लाँच करण्यात आला असून या व्हर्जनला Thar ROXX असं नाव देण्यात आलं आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Thar ROXX ही नवी कोरी कार १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर भारतात लाँच केली जाणार आहे.

थारच्या नव्या व्हर्जनमध्ये पाच दरवाजे असल्यामुळे ही कार आधीच्या थारपेक्षा अधिक मोठी असणार आहे. या थारमध्ये पूर्णपणे नव्या डिजाइनचा फ्रंट फेस देण्यात आला आहे.

नवी थार १.५ लीटर डिझल, २.० लीटर डिझल आणि २.२ लीटर डिझल या तीन पर्यांयांसह बाजारात विक्रीसाठी आणली जाणार आहे.

Thar ROXX मध्ये आधीच्या व्हर्जनपेक्षा वेगळे अनेक फीचर्स असणार आहेत.

यामध्ये १०.२५ इंच लांब टचस्क्रीन, LED प्रोजेक्टर हेडलँप, ३६० डिग्री कॅमेरा, पुश-बटन स्टार्टसारख्या फीचर्सचा समावेश असणार आहे.

Thar ROXX मधील फीचर्समध्ये फ्रंट आणि रियर सेंटर आर्मरेस्ट, लदरेट सीट अपहोल्स्ट्री, रियर AC व्हेंट, ६ एअरबॅग्ज आणि एक सनरुफ यांचा समावेश असेल.

दरम्यान, थारच्या आतापर्यंतच्या व्हर्जनमध्ये फक्त फ्रंट डिस्क ब्रेक मिळत असे. मात्र पाच दरवाजांच्या या नव्या थारमध्ये रियर डिस्क ब्रेकचे फीचर्सही उपलब्ध असणार आहे.