स्वदेशी कंपनी ग्रेवटननं लाँच केली Electric Motorcycle क्वांटा; एका चार्जमध्ये जाणार ३२० किलोमीटर By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:08 PM 2021-07-03T17:08:07+5:30 2021-07-03T17:15:53+5:30
Electric Vehicles : सध्या देशात Electric वाहनांचं क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक भारतीय कंपन्यांही आपल्या इलेक्ट्रीक गाड्या बाजारात लाँच करत आहेत. पेट्रोल-डिझेलचे सातत्यानं वाढते दर आणि प्रदुषण कमी करण्याबाबत होत असलेली जागरूकता यामुळे सध्या अनेकांचा कल हा इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे असताना दिसतो. याचदरम्यान अनेक भारतीय स्टार्टअप्सही या शर्यतीत उतरले आहेत.
हैदराबादमीली कंपनी Gravton Motors नं आपली पहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे. कंपनीनं या बाईकची किंमत ९९,००० (एक्स शोरूम) इतकी आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या बाईकची डिलिव्हरी दिवाळीपासून सुरूकरण्यात येणार आहे. तसंच कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ते या बाईकवर २०१६ पासून काम करत आहेत.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही बाईक एका चार्जमध्ये ३२० किमीपर्यंत जाऊ शकते. या बाईकचा टॉप स्पीड ७० किमी प्रति तास इतका आहे.
या बाईकची खरेदी करणाऱ्यांसाठी चार्जिंगची कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी कंपनी बाईक खरेदी करणाऱ्यांच्या घरी एक चार्जर लावणार आहे. ग्रेवटन मोटर्सनुसार या बाईकमद्ये जगातील पहिला रिब केज्ड चेसिस चार्जर देण्यात आलं आहे.
क्वांटाची पेलोड क्षमता ही 250 किलोग्राम आहे. यामध्ये 3kW इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आली आहे. यामध्ये 4bhp आणि 170Nm टॉर्क जनरेट करते.
या बाईकमध्ये रिमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. तसंच ती घरीही चार्ज करता येऊ शकेल. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक १५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. तसंच ईकोमोडममध्ये हीबाईक ३२० किलोमीटरची रेंज देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.
बाईकमध्ये दोन मोड चार्जिंगचा समावेश आहे. यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. ९० मिनिटांमध्ये १ किमी प्रति मिनिट दरानं बॅटरी चार्ज करू शकतात. या इलेक्ट्रीक बाईकमध्ये स्मार्ट फीचर देण्यात आलं आहे. या बाईकचं एक अॅपही आहे. त्याच्या मदतीनं तुम्ही बाईक लॉक/अनलॉक करू शकतात.
बाईकमध्ये दोन मोड चार्जिंगचा समावेश आहे. यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे. ९० मिनिटांमध्ये १ किमी प्रति मिनिट दरानं बॅटरी चार्ज करू शकतात. या इलेक्ट्रीक बाईकमध्ये स्मार्ट फीचर देण्यात आलं आहे. या बाईकचं एक अॅपही आहे. त्याच्या मदतीनं तुम्ही बाईक लॉक/अनलॉक करू शकतात.
यासोबत लाईट्स ऑन आणि ऑफ, रोडसाईड असिस्टंट आणि मॅपिंग सर्व्हिस स्टेशन सारख्या सुविधाही देण्यात आली आहे. कंपनी या बाईकसोबत पाच वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे.