जबरदस्त मायलेज, उत्तम फीचर्स; ११९ टक्क्यांनी वाढली Hyundai च्या 'या' कारची विक्री By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:13 PM 2021-08-11T13:13:06+5:30 2021-08-11T13:27:09+5:30
Hyundai Compact Sedan Car : अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे Hyundai ची ही सेडान कार. जबरदस्त मायेलज आणि फीचर्ससह येणाऱ्या कारची झाली सर्वाधिक विक्री. भारतीय बाजारात सब कॉम्पॅक्ट सेडान कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत, मारुती सुझुकीपासून ह्युंदाई आणि टाटा मोटर्स पर्यंत, दिग्गज प्लेयर्सनं या विभागात त्यांच्या सर्वोत्तम कार लाँच केल्या आहेत.
जरी मारुती सुझुकी डिझायर नेहमीच या विभागात पहिल्या क्रमांकावर राहिली असली तरी जुलै महिन्यात Hyundai Aura नं बाजारात झपाट्याने पकड घेतली आहे.
कंपनीद्वारे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात Maruti Dzire 10,470 युनिट्ससह पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर जुलै महिन्यात Hyundai Aura ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी दुसरी कार बनली आहे.
कंपनीने या कारच्या एकूण 4,034 युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी जुलै महिन्यात 1,839 युनिट्सच्या तुलनेत 119.3 टक्क्यांनी अधिक आहे.
ह्युंदाई नेहमीच मारुती सुझुकीची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी राहिली आहे. वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत, ह्युंदाई आपल्या कारशी तडजोड करत नाही.
याशिवाय ह्युंदाईचे इंटीरियरही ग्राहकांच्या पसंतीस पडत असतं. एकूण 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये येणारी ऑरा सेडान दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन तसेच सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
कंपीनं या कारच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 1.2 लिटर क्षमतेच्या इंजिनचा वापर केला आहे. ते 81bhp ची पॉवर आणि 111Nm चा टॉर्क जनरेट करते.
तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये कंपनीनं 1.0 लिटर टर्बोचार्ज इंजिन दिलं आहे. ते 98bhp ची पॉवर आणि 172Nm चा टॉर्क जनरेट करते.
Hyundai Aura या कारच्या डिझेल व्हर्जनमध्ये 74bhp/190Nm च्या 1.2 लिटर इंजिन देण्यात आलं आहे.
इंटिरिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर याचं केबिन ब्राऊन आणि ब्लॅक कलरनं डिझाईन करण्यात आलं आहे. यामध्ये बऱ्यापैकी Nios हॅचबॅकचे कंपोनन्ट्स पाहायला मिळतात.
यामध्ये अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो आणि अनेक कनेक्टिव्हीटी पर्यायांसह ८ इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आलं आहे.
टचस्क्रीन सिस्टम सेमी डिजिटल स्पीडोमीटरसह एका मोठ्या युनिटप्रमाणे देण्यात आलं आहे. याशिवाय तुम्हाला ड्रायव्हर सीटसाठी क्लायमेट कंट्रोलसोबतच हाईट अॅडजस्टमेंटही मिळते.
Hyundai Aura ची किंमत 6 लाख रूपयांपासून सुरू होते आणि 9.36 लाख रुपयांपर्यंत जाते. याच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 6 लाखांपासून 8.72 लाखांपर्यंत आहे.
तर कारच्या CNG व्हेरिअंटची किंमत 7.66 लाख आहे. डिझेल व्हर्जनची किंमत 7.91 लाखांपासून 9.36 लाखांच्या दरम्यान आहे. सामान्यत: या कारचं पेट्रोल व्हर्जन 20 किमी आणि डिझेल व्हर्जन 25 किमी प्रति लिटरचं मायलेज देतं.
Hyundai Aura चं सीएनजी व्हेरिअंट एक किलोग्राम सीएनजीमध्ये २८ किलोमीटरपर्यंतचं मायलेज देतं. दरम्यान, हे मायलेज ड्रायव्हिंगची पद्धत आणि रोड कंडिशनवर आधारित आहे.